- मुख्यपृष्ठ
- मोटर विमा
- कार विमा
- व्यापक विमा आणि तृतीय पक्ष विमा ह्यांच्यातील फरक
व्यापक विमा आणि तृतीय पक्ष विमा ह्यांच्यातील फरक
भारतात तुमच्या वाहनासाठी योग्य प्रकारच्या विम्याची निवड करणं हे महत्वाचं असतं. कारण तृतीय पक्षाला (तृतीय पक्ष) संरक्षण देणारा कमीत कमी एक मूलभूत विमा असणं आवश्यक असतं. आणि असा एकही विमा नसेल तर त्यामुळे कायद्याचं उल्लंघन होऊ शकतं. शिवाय, कधीकधी ह्यामुळे चालक परवाना (ड्रायविंग लायसेंस) रद्द होऊ शकतो.
एखाद्या दुर्घटनेमुळे, जी मोठी किंवा लहान असू शकते, उद्भवू शकणार्या हानी (डॅमेजेस), दंड, नुकसान हयापासून तुमचं रक्षण करण्यासाठी दोन प्रकारच्या कार विमा योजना बाजारात उपलब्ध आहेत. ह्या विमा योजना आहेत – व्यापक (कॉम्प्रिहेन्सिव्ह) कार विमा आणि तृतीय-पक्ष कार विमा. कोणता कार विमा तुमच्या कारला आणि तुम्हाला जास्त अनुरूप आहे हे जाणून घेण्यासाठी, ह्या दोन कार विमा प्रकारांमधला फरक समजून घेण्याचा सल्ला दिला जातो आहे.
व्यापक विमा म्हणजेकाय?
व्यापक कार विमा एक विस्तृत कार विमा योजना आहे जी विमीत (इन्शुअर्ड) वाहनाला तृतीय पक्ष दायित्व आणि त्याच्या स्वतःच्या नुकसानापासून संरक्षण (कव्हर) देते. हे विमापत्र (पॉलिसी) अपघाती नुकसान, मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती, आग वगैरेपासून संरक्षण देते. व्यापक कार विमा नेहेमीच्या हप्त्यात (प्रीमियम), तसेच काही ऍड - ऑन कव्हर्स बरोबरही उपलब्ध होऊ शकतो.
अनपेक्षित नैसर्गिक आपत्ती जसं की वादळ, भूकंप, पूर, वगैरेंमध्ये होणार्या नुकसानाची हा भरपाई करतो. हा वीमित कारचं मानवनिर्मित आपत्तींपासूनही रक्षण करतो, ज्यात चोरी, अपघात, हल्ला, घरफोडी, आग वगैरेंचा समावेश होतो.
हे संरक्षण आणखी कव्हर्स निवडून वाढवणं शक्य आहे, जसं की इंजिन संरक्षक, अॅक्ससरीज (ऊपकरणे) कव्हर, वैद्यकीय खर्च, झीरो डेप्रिसिएशन (शून्य घसारा) कव्हर, वगैरे. हे कव्हर खूप लोकप्रिय आहे कारण ते संपूर्ण संरक्षण देतं आणि ते विमापत्र धारकाला तणावमुक्त करतं
व्यापक कार विमा योजना विकत घेण्या चे फायदे.
व्यापक कार विमा योजना विमीत वाहनाचा खालील गोष्टींपासून बचाव करते.
- नासधूस
- चोरी
- काचेचे नुकसान जसं की विंड्शील्डचं नुकसान
- पक्षी किंवा प्राण्याने केलेलं नुकसान
- पडत्या वस्तु, क्षेपणास्त्र इत्यादींमुळे झालेले नुकसान.
- आग
- पूर
- नैसर्गिक आपत्ती जसं की वार्याचं वादळ, गारांचं वादळ, तुफान, चक्रीवादळ इत्यादींमुळे होणारं नुकसान
- तृतीय पक्ष दायित्व
जर तुमच्या कारचं नुकसान झालं आणि ते रस्त्यावरच्या दुर्घटनेमुळे नसेल तर व्यापक विम्याशिवाय दावा दाखल केला जाऊ शकत नाही
व्यापक कार विमा योजने तील अपवाद
हे आहेत व्यापक कार विमा योजनेच्या कव्हरेजमधून वगळलेले घटक
- झीज आणि वाहनाचे जुने होणे.
- घासारा. (डेप्रिसीएशन)
- यांत्रिक किंवा विद्युत यंत्रबिघाड.
- नळया आणि टायर्सचे नुकसान. अपघातामुळे वाहनाच्या नळया, टायर्स खराब झाल्यास विमा प्रदात्याचं दायित्व एकूण बदली शुल्काच्या ५० टक्यांपर्यंत मर्यादित राहील.
- वैध चालक परवान्याशिवाय चालकाने वाहन चालवल्यामुळे झालेले नुकसान.
- अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यामुळे झालेले नुकसान.
- बंडखोरी किंवा आण्विक हल्ला ह्यामुळे झालेली कुठलीही हानी किंवा नुकसान.
तृतीय पक्ष कार विमा योजना
जेंव्हा विमाधारकाची चूक असते तेंव्हा तृतीय पक्षाच्या दुखापतींमुळे उद्भवणार्या कायदेशीर दयित्वासाठी तृतीय पक्ष कार विमा योजना कव्हरेज देते. ह्यात विमाधारकाच्या वाहनाने तृतीय पक्षाला किंवा त्याच्या मालमत्तेला केलेली हानी आणि दुखापतींपासून संरक्षण मिळतं. मोटार वाहन अधिनियम, १९८८, नुसार प्रत्येक मोटार वाहन मालकाला भारतात कमीत कमी एक तृतीय पक्ष विमा क्व्हरेज विकत घेणं आवश्यक आहे.
तृतीय पक्ष कार विमा योजना विकत घेण्या चे फायदे
तृतीय पक्ष कार विमा योजना वाहनाच्या मालकाला कुठल्याही कायदेशीर दायित्वासाठी कव्हर देते, ज्यात विमित वाहनाच्या सहभागाने तृतीय पक्षाचा मृत्यू किंवा त्याला शारीरिक इजा किंवा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान समाविष्ट असतं. मोटार वाहन अधिनियमानुसार तृतीय पक्षाचा दावा“नो फॉल्ट लायेबिलिटी क्लेम्स” ह्या श्रेणीखली दाखल केला जाऊ शकतो ज्यात दावेदारावर हे बंधनकारक नाही की त्याने ज्याच्यामुळे अपघात किंवा “फॉल्ट लायेबिलिटी क्लेम्स” उद्भवले अशा सहभागी वाहनाच्या निष्काळजीपणाचा आरोप करावा किंवा तो सिद्ध करावा.
तृतीय पक्ष कार विमा योजने तले अपवाद
जर एखादा अपघात झालेला असेल तर एखाद्या वाहनाच्या किंवा वाहनातील एखाद्या सामानाच्या झालेल्या नुकसानाच्या खर्चासाठी तृतीय पक्ष कार विमा योजना संरक्षण देत नाही. त्याचबरोबर तुमच्या कारचं किंवा जर तुमच्या सामानाचं नुकसान झालं किंवा ते चोरीला गेलं तर ही योजना कव्हरेज देणार नाही.
व्यापक कार विमा विरुद्ध तृतीयपक्ष कार विमा
कव्हरेज आणि उद्देश ह्यांच्या आधारावर व्यापक आणि तृतीय पक्ष कार विमा एकमेकांपासून भिन्न आहेत. त्यांच्यातील फरक जाणून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ह्या दोन कार विमा योजनांच्या तुलेनाचा तक्ता.
व्यापक कार विमा |
तृतीय पक्ष कार विमा |
|
व्याख्या |
हा तुमच्या कारला व तुम्हाला पूर्ण विमा संरक्षण देते. ही योजना ना फक्त तुमच्या तृतीय पक्ष दायित्वाचीच काळजी घेते तर तुम्हाला आणि तुमच्या कारला संरक्षण देते. |
सर्वात मूलभूत कार विमा योजना जी तुम्हाला अश्या नुकसान आणि हानीपासून संरक्षण पुरवते जी तुमची कार एखाद्या तृतीय पक्ष मालमत्तेला, किंवा व्यक्तिला, किंवा वाहनाला पोचवू शकते, ती म्हणजे तृतीय पक्ष विमा. |
कव्हरेजचा तपशील |
हा कार विमा विस्तृत कव्हरेज देतो कारण तो ना फक्त तृतीय पक्षाला झालेल्या नुकसनापासून तुमच्या कारला संरक्षण देतो तर तुम्हाला आणि तुमच्या कारला झालेलं नुकसान आणि हानीपासूनही संरक्षण देतं. उदाहरणार्थ जर शहरातील पुरामुळे तुमच्या कारचं नुकसान झालं असेल तर तुमचा व्यापक कार विमा त्यासाठी कव्हरेज देतं. |
हा फक्त तृतीय पक्षालाच कव्हरेज देतो. ह्याचा अर्थ तृतीय पक्ष मालमत्ता किंवा व्यक्ति ह्यांना झालेली हानी किंवा नुकसान ह्या पॉलिसीमध्ये कव्हर केलं जातं आणि तुमच्या कारला झालेली एखादी हानी किंवा नुकसान कव्हर केलं जात नाही. त्याचबरोबर, तृतीय पक्ष विमा व्यक्तीगत अपघातही कव्हर करतो ज्यामुळे तुम्हाला मृत्यू आणि दुखापतींपासून संरक्षण मिळतं. |
फायदे |
ही विमा योजना तृतीय पक्ष आणि स्वतःच्या कारला झालेल्या नुकसानापासून संरक्षण देते. म्हणून, काहीही होवो, तुम्हाला जवळजवळ सर्व गोष्टींपासून संरक्षण आहे. ह्या सगळ्याबरोबरच, नो क्लेम बोनस (एनसीबी) ही आहे ज्याचा तुम्ही प्रत्येक वर्षी पॉलिसी नूतनीकरणाच्यावेळी लाभ घेऊ शकता. |
जर तुम्ही रस्त्यावर चुकून एखाद्या तृतीय पक्षी व्यक्तीचं, मालमत्तेचं किंवा वाहनाचं नुकसान केलं तर हे विमा कव्हर तुम्हाला त्यापासून संरक्षण देतो. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की असा अपघात झाल्यास तुम्हाला तुमच्या खिशाला खार लावायची गरज नाही. |
मर्यादा |
हा तृतीय पक्ष कार विम्यापेक्षा महाग आहे. |
तुमच्यामुळे तुमच्या कारला होणार्या हानी आणि नुकसानापासून हा विमा तुम्हाला संरक्षण देत नाही. |
प्रिमियमची किंमत |
तृतीय पक्ष विम्यापेक्षा हफ्ता जास्त असतो पण तो अनेक घटकांवर आधारित असतो जसं की तुमच्या कारचा मेक आणि मॉडेल, कोणत्या शहरात तुम्ही कार चालवता आहात, आणि तुम्ही घेतलेले रायडर्स. |
व्यापक कार विमा योजनेपेक्षा ही तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असते. प्रिमियमची किंमत आयआरडीएआयने कार्सच्या क्युबिक क्षमतेप्रमाणे पूर्वनिर्धारीत केलेली असते. |
सानुकूलीकरण |
तुमची व्यापक योजना तुमच्या अनुकूल करून घेण्याचं वैशिष्ट्य ह्यात आहे जे तुमच्या गरजेप्रमाणे वेगवेगळे रायडर्स जोडण्याची तुम्हाला परवानगी देतं. |
कस्टमायझेशनची कुठलीही संधी नाही. |
कोणाची निवड करावी |
जरी ही योजना तृतीय पक्ष विम्यापेक्षा महाग आहे, ही तुम्हाला विस्तृत कव्हरेज देते आणि म्हणून जास्त फायदेशीर आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पॉलिसी वर्षात कुठलाही दावा केला नाही, तर तुम्ही नो क्लेम बोनसचा लाभ घेऊ शकता |
जर तुमची कार खूप जुनी असेल किंवा तुम्ही तुमची कार लवकरच विकणार असाल, किंवा तुमच्या कार्सपैकी एखादी क्वचितच चालवली जात असेल, तर तृतीय पक्ष विमा निवडणं योग्य ठरेल. |
तृतीय पक्ष कव्हर आणि व्यापक कव्हर मधील फरक
ह्या दोन कार विमा योजनांच्या प्रकारांचे फायदे आणि तोटे अनेक घटकांवर अवलंबून आहेत. हे घटक समजून घेणं महत्वाचं आहे जेणेकरून तुम्ही विश्लेषण, तुलना करू शकता आणि मग योग्य निर्णय घेऊ शकता.
कारचेमूल्य
जर तुमच्या कारचं मूल्य कमी असेल तर तृतीय पक्ष विमा खरेदी करणं योग्य ठरेल, कारण नुकसानीची डागडुजी अगदी सहजपणे करता येईल. व्यापक विमा संरक्षणाचा उच्च प्रिमियम भरण्याच्या तुलनेत दुरुस्तीची बिलं भरणं किफायतशीर असतं.
दुसरीकडे, जर तुमची कार नवी आणि महाग असेल तर व्यापक विमा कव्हरेज खरेदी करण्याची शिफारस केली जाते आहे.
कव्हरेज
अपघातामुळे झालेल्या कोणत्याही तृतीय पक्ष वाहनाच्या नुकसानासाठी आणि कोणत्याही तृतीय पक्ष शारीरिक दुखापतींसाठी तृतीय पक्ष विमा योजना कव्हरेज प्रदान करते. काही विमा प्रदाते आहेत जे तृतीय पक्ष कव्हरेजसाठी थोडं अतिरिक्त शुल्क आकारतात. हे तुमच्या स्वतःच्या वाहनाला झालेल्या नुकसानासाठी कुठलंही कव्हरेज देत नाही.
जर तुम्ही तुमच्या वाहनासाठी कव्हरेज शोधत असाल तर तुम्ही एक व्यापक कार विमा योजना खरेदी केली पाहिजे. ही विस्तृत कव्हरेज देते, कारण ह्यात तृतीय पक्ष दायित्वदेखील समाविष्ट आहे. तृतीय पक्ष योजनेच्या तुलनेत व्यापक योजना महाग आहे, कारण ती विस्तृत कव्हरेज देते.
खर्च
तृतीय पक्ष योजनेच्या तुलनेत व्यापक योजना महाग आहे कारण ती दुखापती, हानी, आणि चोरीसाठी कव्हरेज देते.
पश्चात्ताप करण्यापेक्षा सावध असणं केंव्हाही उत्तम. रस्त्यावर होणारी दुर्घटना दुर्दैवी असते आणि ती एकाच वेळी तुमची बचत धुवून काढू शकते. जेंव्हा अपवाद आणि फायद्याचा मुद्दा येतो तेंव्हा किरकोळ फरक असू शकतात, कारण ते विमाकर्ता ते विमाकर्ता बदलतात. जर तुम्हाला एकाच वेळी मानसिक शांती आणि तुमच्या वाहनासाठी योग्य विमा संरक्षण हवं असेल तर तुम्ही एक व्यापक कार विमा योजना खरेदी केली पाहिजे कारण ती तुमच्या सर्व विमा अपेक्षा पूर्ण करेल.
वाविप्र(एफएक्यूज)
-
प्र१: व्यापक कार विमा खरेदी करणं एक उत्कृष्ट निर्णय का आहे?
उत्तर:व्यापक कार विमा योजना खरेदी करणं हा एक उत्कृष्ट निर्णय मानला जातो कारण तो तुम्हाला आवश्यक असलेले सर्व फायदे एकाच विमा पॉलिसीअंतर्गत मिळवून देतो. ही तृतीय पक्ष विम्याचं संरक्षण देऊन ना फक्त तुम्हाला कायद्याचे पालन करायला मदत करते तर तुमच्या आणि तुमच्या कारच्या हानीची किंवा नुकसानाची भरपाई करण्यासदेखील मदत करते.
-
प्र२: व्यापक कार विम्या चाखर्च तृतीय पक्ष विम्या पेक्षा जास्तका असतो?
उत्तर:व्यापक कव्हरच्या जास्त खर्चाचे कारण आहे त्यातील विस्तृत समावेश. हे तृतीय पक्ष दायित्व कव्हर करते तसेच स्वतःच्या नुकसानापासून कव्हरेज देते. या व्यतिरिक्त जर तुम्ही शून्य घासारा, ब्रेकडाउन सहाय्य, गियरबॉक्स, आणि इंजिन संरक्षण इत्यादी अॅड-ऑन्सची निवड केली तर व्यापक कव्हरचं प्रीमियम वाढतं.
-
प्र3:नूतनी करणा च्यावेळी तृतीय पक्ष कार विमा पॉलिसी मधू नव्यापक योजने तस्वि चकर ताये तंका?
उत्तर:होय, नूतनीकरणाच्या वेळी तृतीय पक्ष विम्यामधून व्यापक कार पॉलिसीवर स्विच करता येतं.
-
प्र४:व्यापक कार विम्या मध्ये समा विष्टके लेजा ऊशक तील असे काही सर्वो त्तमराय डर्स सांगा?
उत्तर:रायडर्सची निवड तुम्हाला पाहिजे असलेल्या कव्हरेजच्या प्रकारावर आणि तुमच्या कारच्या वयावर अवलंबून असते. जर तुमच्या कारला पाच वर्षाहून कमी वर्ष झाली असतील, तर रिटर्न टू इनवॉइस आणि शुन्य घासारा कव्हरेजसारख्या ऍड-ऑन्सची किंवा रायडर्सची निवड करण्याचा सल्ला दिला जातो आहे ज्यामुळे तुम्ही नुकसान टाळू शकाल. या व्यतिरिक्त रोड-साइड सहाय्यक रायडरची जोड देणं बहुतेक कार प्रकारांसाठी उपयुक्त ठरतं कारण जेंव्हा तुम्ही रस्त्यात अडचणीत सापडाल तेंव्हा तुमच्या जवळ मदत असेल.
Find similar car insurance quotes by body type
#Rs 2094/- per annum is the price for third-party motor insurance for private cars (non-commercial) of not more than 1000cc
*Savings are based on the comparison between the highest and the lowest premium for own damage cover (excluding add-on covers) provided by different insurance companies for the same vehicle with the same IDV and same NCB. Actual time for transaction may vary subject to additional data requirements and operational processes.
##Claim Assurance Program: Pick-up and drop facility available in 1400+ select network garages. On-ground workshop team available in select workshops. Repair warranty on parts at the sole discretion of insurance companies. Dedicated Claims Manager. 24x7 Claim Assistance.