यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी ५५०० पेक्षाही जास्त नेटवर्क हॉस्पिटल्स सोबत संलग्नित आहे.
Read More
यूनिव्हर्सल सोम्पो जनरल विमा कंपनी
यूनिव्हर्सल सोम्पो जनरल विमा कंपनी इंडियन बँक, कर्नाटका बँक, इंडियन ओवरसिज बँक तसेच डाबर इन्वेस्टमेंट कंपनी आणि जपानची अग्र इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने चालते. यूनिव्हर्सल सोम्पो जनरल विमा कंपनी तिच्या विमाधारकांना उत्तम व तात्काळ सेवा देते. या कंपनीचे मुख्यालय भारतात मुंबई येथे स्थित आहे. शाखा अनेक ठिकाणी आहेत. ही कंपनी विविध पर्यायांसह ग्राहकांना विशेष प्राधान्य देते. त्याचप्रमाणे त्यांच्या ग्राहकांना पॉलिसी खरेदी करताना व पॉलिसीचे नूतनीकरण करताना सवलती देऊ करते. यूनिव्हर्सल सोम्पो जनरल विमा कंपनी ही इंडियन जनरल विमा इंडस्ट्रीसोबत भागीदारी करणारी पहिली संस्था आहे. कंपनीची सेवा त्यांच्या ग्राहकांसाठी २४ तास उपलब्ध असते. आरोग्य, मोटार, कार, इत्यादिसर्व विमा पॉलिसी ऑफर करते.
ही कंपनी तिच्या अटी व नियमांसोबत वचनबद्ध तसेच ग्राहकांचे हित जपण्यास सिद्ध असते. तुमच्या सोयीनुसार संबंधित स्त्रोतांच्या माध्यमातून तुम्ही या विमा कंपनीशी संपर्क साधू शकता. जसे अधिकृत संकेतस्थळावरून किंवा प्रत्यक्ष शाखेत भेट देऊन तुम्ही पॉलिसी खरेदी व नूतनीकरणाची योग्य माहिती मिळवू शकता.
तुमच्या आवडीचे यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कव्हरेज निवडा
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा एका दृष्टिक्षेपात
महत्त्वाची वैशिष्ट्ये |
ठळक मुद्दे |
नेटवर्क हॉस्पिटल्स |
५५०० + |
खर्च केलेला दावा गुणोत्तर |
९०.४० % |
नूतनीकरणक्षमता |
आजीवन |
प्रतीक्षा कालावधी |
-- |
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा योजनेच्या अंतर्गत कोणत्या बाबी समाविष्ट होतात ?
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत खालील बाबींचा समावेश होतो, (खाली नमूद केलेल्या बाबी प्रत्येक पॉलिसी परत्वे वेगवेगळ्या असू शकतात.)
इन - पेशंट हॉस्पिटलायझेशन खर्च
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसी विमाधारकाला इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनचा खर्च देऊ करते. यामध्ये कोणतीही दुखापत झाल्याने किंवा आजारपण उद्भवल्याने अॅडमिट झालेल्या संबंधित पेशंटला हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवांचा समावेश होतो. जसे रूम भाडे, आयसीयू सुविधा, आपत्कालीन सेवा, नर्सिंग व बोर्डिंग सेवा, डॉक्टर फी, विविध प्रकारच्या आरोग्य चाचण्या, इत्यादी सर्व सेवा या इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनमध्ये समाविष्ट होतात. याचा लाभ यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत कंपनीचा कोणताही विमाधारक घेऊ शकतो.
हॉस्पिटलायझेशन पूर्व तसेच हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य पॉलिसी हॉस्पिटलायझेशन पूर्व आणि हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च करते. तसेच, रुग्णाला त्याच्या आजार निदान करण्यासाठी सांगण्यात आलेल्या विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांचा तसेच डॉक्टरांच्या तपासणी व समुपदेशनच्या फीचा आणि इंजेक्शनचा खर्च देखील या योजनेमध्ये समाविष्ट आहे. हॉस्पिटलायझेशन पूर्व तीस दिवस आणि हॉस्पिटलायझेशन नंतर ६० दिवसांपर्यंतचा खर्च कव्हर कंपनी विमा पॉलिसीच्या माध्यमातून देते. दिवस कालावधीची मर्यादा पॉलिसी परत्वे वेगळी असू शकते. अशाप्रकारे, हॉस्पिटलायझेशन पूर्व आणि हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च कव्हरेज तुम्हांला यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य पॉलिसी अंतर्गत मिळू शकतो.
दैनंदिन उपचार - सेवा प्रक्रियांचा खर्च :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य पॉलिसीच्या दैनंदिन उपचार-सेवांच्या यादीत एकूण २४ तासातील हॉस्पिटलमध्ये पेशंटला त्याच्या आजार किंवा दुखापतीवर इलाज म्हणून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मेडिकल आणि पॅरामेडिकल सेवांचा अंतर्भाव होतो ज्याचा खर्च यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसी देऊ लाभार्थी विमाधारकास देऊ करते.
आयुष उपचार :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य पॉलिसी त्यांच्या विमाधारकांना आयुष पद्धतींत उपचार करण्यासाठी कव्हरेज देते. जर संबंधित व्यक्तीने त्याच्या आजाराच्या अथवा दुखापतीच्या इलाजासाठी आयुष उपचार पद्धती अवलंबली असेल तर त्या उपचारांचा खर्च पॉलिसी कव्हर करते. यात आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा देखील समावेश आहे.
रुग्णवाहिकेचा खर्च :
आरोग्य सेवेत पेशंटला सुरक्षित शिफ्ट करण्यासाठी रुग्णवाहिका महत्वाची कामगिरी बजावते. तर, पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिकेचा खर्च यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी करते. जी एक आपत्कालीन आरोग्य सुविधा म्हणून ओळखली जाते. त्याचा खर्च आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत कंपनी कव्हर करते.
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा योजनेच्या अंतर्गत कोणत्या बाबी समाविष्ट होत नाहीत ?
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत खालील बाबींचा समावेश होत नाही, (खाली नमूद केलेल्या बाबी प्रत्येक पॉलिसी परत्वे वेगवेगळ्या असू शकतात.)
साहसी खेळांमध्ये झालेली दुखापत :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी जर साहसी खेळामध्ये किंवा शर्यतीमध्ये सहभागी होऊन संबंधित व्यक्तीची आरोग्यहानी झाली असेल किंवा त्याला दुखापत झाली असेल तर अशा बाबतींत ही विमा कंपनी हॉस्पिटल उपचाराचे कव्हर त्या ग्राहकाला देऊ करत नाही. अशा केसमध्ये तुम्ही कंपनीच्या विमा लाभापासून वंचित राहू शकता.
जाणूनबुजून करून घेतलेली किंवा दुसऱ्याकडून झालेली इजा :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी पूर्वकल्पना घेऊन किंवा मुद्दाम जाणून बुजून इजा करून घेतलेल्या केसच्या हॉस्पिटल खर्चाचा कव्हरेज संबंधित विमाधारकास देत नाही. विमा धारक जर जाणूनबुजून किंवा पूर्वकल्पना येऊन एखाद्याने स्वत:ला इजा करून घेतली असेल किंवा इजा झाली असेल तर त्यासाठीच्या उपचारास लागणारा खर्चाची जबाबदारी विमा कंपनी घेत नाही. उदाहरणार्थ आत्मघाताचा प्रयत्न, इत्यादि.
गुन्हेगारी कृत्यांत सहभाग :
तसेच, संबंधित व्यक्तीला त्याने वैयक्तिक पातळीवर केलेल्या किंवा एखाद्या गटासोबत केलेल्या गुन्ह्यांत सामील झाल्याने जीवाला दुखापत झाली असेल तर त्याच्या उपचाराचा खर्च विमा कंपनी देत नाही. संबंधित आरोग्य विमा लाभार्थी कोणत्याही गुन्हेगारी प्रकारच्या कृत्यांत सहभागी असल्यास किंवा असल्याचे अढल्यास त्या पेशंटच्या आरोग्य सेवेचा हॉस्पिटल खर्च यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीच्या पर्यायांत येत नाही.
एड्स वरील उपचार :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी एड्स वरील किंवा इतर लैंगिक आजारवारील उपचारचे कव्हरेज देत नाही. त्या आजाराशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या सेवांचा खर्च कंपनी कव्हर करत नाही. या अंतर्गत एचआयव्ही किंवा दुसऱ्या कोणत्या वैद्यकीय स्थितीचा इलाज समाविष्ट नाही.
एखाद्या पदार्थाचे अतिसेवन :
एखाद्या अमली पदार्थाच्या किंवा मादक द्रव्यांच्या अतिसेवनामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य तक्रारींवर उपचार करण्याचे कव्हर यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी त्यांच्या कस्टमर्सना देऊ करत नाही. दारूचे अती सेवन, स्मोकिंग, ड्रग्स अॅडिक्शन, तंबाखू आणि गुटखा इत्यादी पदार्थांचे अती व्यसन करून आजारी पडलेल्या व्यक्तीच्या उपचाराचा कव्हरेज विमा कंपनी देत नाही.
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसी
महत्वाची वैशिष्ट्ये, यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसीची काही वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे,
२०५ आयआरडीएआय - मान्यताप्राप्त विमा उत्पादन :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीच्या २०५ विमा उत्पादनांना आयआरडीएआय च्या मान्यतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. आयआरडीएआय म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया या भारत सरकारच्या प्रतिष्ठीत आणि अधिकृत संस्थेकडून या विमा कंपनीच्या विमा उत्पादनांना अधिकृत प्रमाणपत्र मिळाले असून ही गौरवास्पद बाब आहे म्हणजे यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी त्यांच्या ग्राहकांना देत असलेल्या सर्वोत्तम विमा पॉलिसी सेवेची पावती आहे.
५५००+ नेटवर्क हॉस्पिटल्सचे विशाल जाळे :
५५०० पेक्षा जास्त दर्जेदार सेवा देणारे नेटवर्क हॉस्पिटल्स यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीच्या सोबत आहेत. नेटवर्क हॉस्पिटल्सचे इतके विशाल जाळे असलेली ही आरोग्य विमा कंपनी त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा मिळावी यासाठी हॉस्पिटल्सची सूची सदैव नूतनीकरण करत असते. कॅशलेस व्यवहार, तात्काळ सेवा आणि उत्तम व्यवस्थापन या गोष्टींना यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी प्राधान्य देते.
प्रभावी दावा सेटलमेंट गुणोत्तर :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीचे दावा सेटलमेन्ट गुणोत्तर प्रभावी आहे. त्यांच्या कस्टमर्सचे दावा सेटलमेन्ट केसेस कंपनी योग्य रित्या सिद्धीस नेते. गेल्यावर्षीचे दावा सेटलमेन्ट गुणोत्तर याचे उत्तम उदाहरण आहे. सर्व नियम आणि अटी यांची पुष्टी करत यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी दावा सेटलमेन्ट करण्याच्या प्रक्रियेत ग्राहकांच्या सेवेसाठी चोवीस तास ऑनलाइन तसेच ऑफलाइन व्यासपीठावर उपलब्ध असते.
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीच्या विविध आरोग्य विमा योजना :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी त्यांच्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या आरोग्य विमा योजना ऑफर करते उदाहरणार्थ यूनिव्हर्सल सोम्पो वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी, यूनिव्हर्सल सोम्पो प्रवासी भारतीय विमा पॉलिसी, यूनिव्हर्सल सोम्पो ग्रुप आरोग्य विमा पॉलिसी इत्यादी. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
-
यूनिव्हर्सल सोम्पो वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत त्या विमाधारकाचा हॉस्पिटल खर्च कव्हर होतो. या आरोग्य विमा पॉलिसीची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत,
वैशिष्ट्ये:
- वयाच्या ५५ वर्षापर्यंत तुम्ही यूनिव्हर्सल सोम्पो वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करू शकता.
- या पॉलिसी अंतर्गत विमाधारकाचे पूर्व अस्तित्वातील कोणतेही आजार कंपनी कव्हर करत नाही.
- तसेच, या पॉलिसी अंतर्गत आपत्कालीन स्थितीत कंपनीकडून तुम्हांला पाच लाख इतका हॉस्पिटल खर्च कव्हरेज मिळू शकतो.
- तुमचा सर्व हॉस्पिटलायझेशन खर्च या विमा पॉलिसी अंतर्गत कंपनी कव्हर करते जसे रूम भाडे, औषधे, ऑक्सिजन, ब्लड, डॉक्टर फीज, नर्सिंग, बोर्डिंग चार्ज, आयसीयू, रुग्णवाहिका, इत्यादि.
-
यूनिव्हर्सल सोम्पो प्रवासी भारतीय विमा पॉलिसी ही योजना जे लोक कामानिमित्त बाहेरील प्रांतांत राहतात त्यांच्यासाठी आहे. या विमा पॉलिसीची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत,
वैशिष्ट्ये:
- यूनिव्हर्सल सोम्पो प्रवासी भारतीय विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठीची प्रवेश मर्यादा ही वय १८ वर्षे ते ६५ वर्षे इतकी असून त्या भारतीय व्यक्तिकडे परराष्ट्रांतील कामाचे अधिकृत ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.
- प्रवासात वैयक्तीक अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व ओढवल्यास ही पॉलिसी आर्थिक सुरक्षा देऊ करते.
- सर्व प्रकारचा वैद्यकीय खर्च पॉलिसी कव्हर करते.
- कुटुंबातील सदस्यांचे हॉस्पिटलायझेशन खर्च विमा कंपनी याच योजने अंतर्गत कव्हर करते.
- ही पॉलिसी खरेदी करताना संबंधित व्यक्तीचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त असल्यास त्याला काही वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागते
- जर संबंधित व्यक्तीला प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असेल तरी तो सल्ला न पाळता केलेल्या प्रवासात त्याला हानी झाली तर त्याचा कव्हरेज कंपनी देत नाही.
-
यूनिव्हर्सल सोम्पो ग्रुप आरोग्य विमा पॉलिसी ही एखाद्या संस्थेत, क्लब अथवा असोसिएशनच्या एम्प्लॉईजसाठी काढली जाते. या आरोग्य विमा पॉलिसीची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत,
वैशिष्टये:
- यूनिव्हर्सल सोम्पो ग्रुप आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठीची वयाची मर्यादा ही ५५ वर्षांपर्यंत आहे.
- पूर्व अस्तित्वातील आजार या पॉलिसीत कव्हर होत नाहीत ते तुम्हांला अॅड करावे लागतील तसेच क्रिटिकल इलनेस कव्हर सुद्धा तुम्ही अॅड करू शकता.
- या पॉलिसी अंतर्गत तुम्हांला पाच लाख पर्यन्तचा हॉस्पिटल खर्च कव्हरेज मिळू शकतो.
-
यूनिव्हर्सल सोम्पो अपघात सुरक्षा विमा पॉलिसीच्या अंतर्गत अचानक अपघाती मृत्यू ओढवल्याने संबंधितांना सुरक्षा दिली जाते तसेच अपघातामुळे अपंगत्व आल्याने कमवण्याचे साधन हरपले तर ही पॉलिसी तुम्हांला सुरक्षा देते. कंपनीकडून या पॉलिसीचे मिळणारे कव्हरेज पॉलिसी परत्वे वेगवेगळे असू शकते. तर, या विमा पॉलिसीची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत,
वैशिष्ट्ये:
- यूनिव्हर्सल सोम्पो अपघात सुरक्षा विमा पॉलिसी खरेदीची प्रवेश वय मर्यादा ही १८ वर्ष ते ६५ वर्ष इतकी असून ही पॉलिसी त्या विमाधारकांना आजीवन नूतनीकरणाची सुविधा देते.
- या पॉलिसी अंतर्गत पालक विमधारकांची मुले जी वय ६ ते २५ वर्षे या गटातील आहेत त्यांनासुद्धा कंपनी सुरक्षा देते.
- ही पॉलिसी कॅन्सर, पॅरालायसिस अटॅक, अवयव प्रत्यारोपण, किडनी फेल्युर इत्यादि आजारांच्या उपचाराचा खर्च कव्हर करते.
- पूर्व अस्तित्वातील आजार या पॉलिसीत कव्हर होत नाहीत ते तुम्हांला अॅड करावे लागतील.
-
यूनिव्हर्सल सोम्पो सुपर हेल्थ केअर विमा पॉलिसी ही एक टॉप अप विमा योजना असून ती हॉस्पिटलायझेशन खर्च, रुग्णवाहिका खर्च कव्हर करते. या आरोग्य विमा पॉलिसीची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत,
वैशिष्ट्ये:
- पॉलिसी खरेदी करण्यासाठी वय ५५ वर्षांपर्यंत कोणत्याही वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागत नाही.
- या पॉलिसी अंतर्गत कंपनी त्यांच्या ग्राहकास वीस लाख पर्यन्तचा कव्हरेज देऊ करते.
- कोणतेही आजारपण, दुखापत, अपघाती हानी इत्यादींचा हॉस्पिटल खर्च कव्हर करते.
- निवासी हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर, बाळंतपण खर्च कव्हर, रुग्णवाहिका खर्च कव्हर या सर्व फायद्यांचा लाभ कंपनी विमाधारकास देते.
-
यूनिव्हर्सल सोम्पो कंप्लीट हेल्थ केअर विमा पॉलिसी ही एक सर्वसमावेशक लाभ मिळवून देणारी पॉलिसी असून बेसिक, इसेन्शियल, प्रीविलेज, प्लस, प्रीमियर, एक्झेकुटिव्ह, डिजी- प्रो या सात पर्यायांत उपमबद्ध आहे. तर, या पॉलिसीची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत,
वैशिष्ट्ये:
- यूनिव्हर्सल सोम्पो कंप्लीट हेल्थ केअर विमा पॉलिसीच्या खरेदीची प्रवेश वय मर्यादा ही वय १८ वर्षे ते ७० वर्षे इतकी आहे.
- अवयवदात्याचा खर्च या पॉलिसी च्या अंतर्गत कव्हर होतो तसेच दैनंदिन हॉस्पिटलमधील उपचार सेवा कंपनी कव्हर करते.
- वय तीन महिन्यांपासूनच्या पालक विमाधारकांच्या मुलांना पॉलिसी अंतर्गत सुरक्षा मिळते.
- पॉलिसी खरेदी केल्यापासून तीन वर्षांपर्यंत पूर्व अस्तित्वातील आजार या पॉलिसीत कव्हर होत नाहीत.
-
यूनिव्हर्सल सोम्पो सीनियर सिटीझन आरोग्य विमा पॉलिसी ही खास एका विशिष्ट वयोगटातील वृद्ध लोकांसाठी कंपनीने आखलेली योजना आहे. या विशेष आरोग्य विमा पॉलिसीची वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत,
वैशिष्ट्ये:
- यूनिव्हर्सल सोम्पो सीनियर सिटीझन आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठीची वयोमर्यादा वय ६० वर्षे ते ७० वर्षे इतकी आहे.
- पॉलिसी खरेदी केल्यानंतर पहिली दोन वर्षे कोणताही कव्हरेज दिला जात नाही. त्यानंतर तुम्ही लाभ मिळवू शकता.
- या पॉलिसी अंतर्गत आजीवन पॉलिसी नूतणीकरणाची सोय कंपनी त्यांच्या विमाधारकांना देऊ करते.
- हॉस्पिटलायझेशन पूर्व तीस दिवसांचा आणि हॉस्पिटलायझेशन नंतर साठ दिवसांचा कव्हर मिळतो.
- हॉस्पिटलायझेशन दरम्यानचा सर्व वैद्यकीय खर्च कंपनीकडून कव्हर केला जातो जसे औषधे, इंजेक्शन, एक्स-रे, डायलेसिस, पेसमेकर, इत्यादिसेवांचा यांत अंतर्भाव होतो.
पॉलिसीबाजार वरुन यूनिव्हर्सल सोम्पो कंपनीची आरोग्य विमा पॉलिसी कशी खरेदी करावी ?
तुम्हांला जर यूनिव्हर्सल सोम्पो कंपनीची आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करायची असेल तर तुम्ही त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन तिथे त्याबद्दल मुबलक माहिती प्राप्त करू शकता. तसेच, पॉलिसी खरेदी करण्याच्या बाबतीत पॉलिसीबाजार सुद्धा तुम्हांला विशेष सहाय्य करतो. जसे तुम्ही पॉलिसीबाजारच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन तुमच्या सोयीची आणि फायद्याची आरोग्य विमा पॉलिसी सहज खरेदी करू शकता. तर, पॉलिसीबाजार वरुन यूनिव्हर्सल सोम्पो कंपनीची आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करताना संबंधित ग्राहकाला खाली दिलेल्या सर्व पायऱ्यांचा पाठपुरावा करावा लागतो,
पायरी एक :
सर्वांत आधी www.policybazaar.com या पॉलिसीबाजारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
पायरी दोन :
त्यानंतर तेथील आरोग्य विमा पेजवर जा.
पायरी तीन :
पुढे तुम्ही इन्शुरन्स गणक पेजवर जाऊन तुम्ही तुमच्या सोयीची व योग्य ती विमा योजना खरेदी करू शकता.
पायरी चार :
तुमच्या मूलभूत माहितीची नोंद करा जसे नाव, संपर्क क्रमांक, वय, योजनेचा प्रकार, इत्यादी.
पायरी पाच:
पुढील पेजवर तुम्हाला संबंधित काही आरोग्य विमा योजना सुचविल्या जातील.
पायरी सहा:
सर्व योजनांची तुलना करून तुम्ही तुमची गरज व सोय यांच्याशी जुळून येणारी फायदेशीर अशी योजना तुमच्यासाठी किंवा तुमच्या परिवारासाठी निवडू शकता.
पायरी सात:
अशाप्रकारे, शेवटच्या पायरीत प्रीमियम भरून तुम्ही यूनिव्हर्सल सोम्पो विमा कंपनीची आरोग्य संरक्षण पॉलिसी खरेदी करून अपेक्षित तो लाभ मिळवू शकता.
पायरी आठ :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीकडून प्राप्त झालेले प्रमाणपत्र व पावत्या जतन करून ठेवणे.
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण कसे करावे ?
कोणत्याही पॉलिसीचे तिची अंतिम मुदत संपण्याच्या आत नूतनीकरण करणे आवश्यक असते कारण पॉलिसीचे वेळोवेळी नूतनीकरण केल्याने विमाधारक आपत्कालीन स्थितीत त्या पॉलिसीच्या लाभासाठी पात्र राहतो. तर, यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीच्या पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी खालील सर्व बाबींचा पाठपुरावा करावा लागतो,
- सर्वप्रथम यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- पॉलिसी नूतनीकरणाच्या पानावर जाऊन तुमच्या पॉलिसीचा क्रमांक व पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- त्यानंतर सर्व गोष्टींची पुष्टी झाल्यानंतर पॉलिसी नूतनीकरणाच्या बटणावर क्लिक करा.
- तुमच्या सोयीची पद्धत अवलंबून आरोग्य विमा पॉलिसीचे प्रीमियम पे करा. ही नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यूनिव्हर्सल सोम्पो विमा कंपनीकडून तुम्हांला रिसिप्ट मिळेल ती सेव्ह करून ठेवा.
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा योजनेच्या अंतर्गत दावा कसा दाखल करावा ?
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीचा ग्राहक दोन प्रकारे म्हणजे कॅशलेस दावा आणि प्रतिपूर्ति दावा असे द्यावे दाखल करू शकतो त्याची सविस्तर माहिती पुढे नमूद केल्याप्रमाणे,
कॅशलेस दावा :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा योजनेंतर्गत कॅशलेस दावा दाखल करण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्यांचा पाठपुरावा करा,
पायरी एक :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये भरती व्हा. कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर लगेच किंवा हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा डॉक्टरांचा सल्ला असेल तर त्याआधी किंवा हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर पहिल्या ४८ तासांच्या आत कंपनीला यासंबंधी कळविणे अत्यंत आवश्यक असते.
पायरी दोन :
अचानक आपत्कालीन हॉस्पिटल भरती व्हायचे असेल तर अशा कठीण प्रसंगी २४ तासांच्या आत कळविणे भाग असते. पूर्व अधिकृतीकरण करण्यासाठी तुम्ही विमा कंपनीच्या १८०० २०० ५१४२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुमच्या हॉस्पिटल भरती विषयी कळवू शकता.
पायरी तीन :
हॉस्पिटलमधून कॅशलेस दाव्यासंबंधी एक फॉर्म दाखल करणे आवशक्य आहे. नंतरच्या प्रक्रियेत कॅशलेस दावा करावयाचा एक फॉर्म हॉस्पिटलमध्ये योग्य माहितीसह भरून झाल्यानंतर टिपीएला दाखल करा. पुढच्या गोष्टींचा लाभ मिळवण्याकरिता ही पायरी महत्त्वाची मानली जाते.
पायरी चार :
कॅशलेस दावा करण्यासाठीचा फॉर्म भरून दाखल झाल्यानंतर तिथे त्या फॉर्ममध्ये नमूद झालेल्या सर्व माहितीची पडताळणी होते. ही पडताळणी करताना तुमच्या पॉलिसीतील नियम व अटी यांच्या सोबत तुम्ही दाखल केलेल्या दाव्याची तुलना करतात. आणि, आवश्यक त्या सर्व बाबी तपासतात.
दाव्याचे सेटलमेन्ट :
जर वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींची अचूक पूर्तता तुमच्याकडून झाली तर तुम्ही केलेल्या कॅशलेस दाव्याला कंपनीकडून मान्यता मिळते. यानंतर विमादाता त्या नेटवर्क हॉस्पिटलला तुमची अधिकृतता कळविते. तुमच्या कॅशलेस दाव्यास तुम्ही पात्र सिद्ध झाल्याने विमादाता हॉस्पिटल खर्चाचे कॅशलेस पेमेंट करतो.
प्रतिपूर्ति दावा :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा योजनेंतर्गत प्रतिपूर्ति दावा दाखल करण्यासाठी खाली दिलेल्या काही पायऱ्यांचा पाठपुरावा करा,
पायरी एक :
तुमच्या सोई नुसार कोणत्याही नॉन नेटवर्क होस्पिटलमध्ये भरती व्हा. हॉस्पिटल भरती नंतर पुढच्या २४ तासांच्या आत यासंबंधीची माहिती संबंधित विमा कंपनीला कळवा. ही पायरी आवश्यक मानली जाते. पूर्व अधिकृतीकरण करण्यासाठी तुम्ही विमा कंपनीच्या १८०० २०० ५१४२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुमच्या हॉस्पिटल भरती विषयी कळवू शकता.
पायरी दोन :
तुम्ही भरती झालेल्या हॉस्पिटलमधून आवश्यक ती ट्रीटमेंट घ्या आणि बिल सेटल करा. त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले सर्व प्रकारचे आजार निदानासाठी आणि मुक्तीसाठी आवश्यक ते उपचार करून घेणे. संपूर्ण उपचार दरम्यान आलेला सर्व सेवा प्रक्रियांचा उपचार खर्च तुम्ही भरा.
पायरी तीन :
हॉस्पिटलमधील उपचार दरम्यानचे सर्व कागदपत्रे, पावत्या आणि रिपोर्टस गोळा करणे. हॉस्पिटल मधील प्रत्येक कागदपत्राला विशेष महत्व असते. तिथे तुम्हांला प्राप्त होणाऱ्या प्रत्येक मेडिकल सेवेची पावती दाखल करणे आवश्यक असते. या सूचीमध्ये पुढील सर्व कागदपत्रांचा समावेश होतो. उदाहरणार्थ हॉस्पिटलचे बिल, मेडिकल मधील औषध बिल, ऑपरेशन साहित्य बिल, पॅथोलॉजी बिल, एक्स रे बिल, डॉक्टर समुपदेशन फी बिल, आयसीयू बिल, इतर सर्व मेडिकल उपचार साहित्य बिल, इत्यादी.
पायरी चार :
अचूक माहितीची सर्व कागदपत्रे तुम्हाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळल्यानंतर पुढच्या सात दिवसांच्या आत कंपनीकडे दाखल करावे लागते. नंतर तुमचा दावा दाखल होतो. आणि, विमा कंपनीकडून पुढच्या प्रक्रिया केल्या जातात. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर कंपनी तुमचा दावा वठवते आणि पैसे तुमच्या खात्यात पाठवते.
वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी दावा दाखल प्रक्रिया :
पायरी एक :
शक्य तितक्या लवकर कंपनीला अपघात विषयक माहिती द्या. टोल फ्री क्रमांकावर कॉल करून किंवा तुमच्या सोयीच्या इतर कोणत्याही माध्यमांतून आधी कंपनीला कळवा.
पायरी दोन :
त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्याची एफआयआर नोंद कर आणि त्याची एक प्रत मिळवा. ही पायरी अपघाताच्या केसमध्ये गरजेची असते.
पायरी तीन :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीकडे आवश्यक ती कागदपत्रे सादर करा. सर्वप्रथम दावा दाखल फॉर्म अचूक भरून घ्या. सोबत जोडायची कागदपत्रे जोडा जसे एफआयआर प्रत, पॉलिसीची प्रत आणि इतर सर्व अहवाल, इत्यादी.
पायरी चार :
योग्य ती पडताळणी झाल्यावर कंपनी तिच्या नियम आणि अटींची पुष्टी करत तुमचा वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीच्या अंतर्गत केलेला दावा सिद्धीस नेते.
दावा दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसीच्या अंतर्गत दावा दाखल करताना पुढे नमूद केलेली सगळी कागदपत्रे आवश्यक असतात तसेच ती अचूक आणि संपूर्ण माहिती देणारी असावीत,
- तुमच्या आवश्यक माहिती व स्वाक्षरीसह दावा केल्याचा फॉर्म
- हॉस्पिटल डिस्चार्ज रिपोर्टची मूळ प्रत
- सर्व वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल
- इतर सर्व वैद्यकीय चाचणी केलेल्या बिलांची मूळ प्रत
- मेडिकलमधून औषध खरेदीची अधिकृत पावती
- हॉस्पिटल ट्रीटमेंट बिल मूळ प्रत
- हॉस्पिटल ट्रीटमेंट संबंधी सर्वच सेवा खर्चाचा मूळ अहवाल
- इतर कोणतेही कागदपत्र कंपनीला आवशक्य असल्यास कंपनी ते मागवु शकते.
टीप : जर कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती तुमच्या दावा दाखल फॉर्म अथवा कागदपत्रांत आढळल्यास किंवा अपूर्ण माहिती नमूद झाल्यास तुमचा कॅशलेस दावा कंपनीकडून मंजूर होत नाही. तसे झाल्यास तुम्ही हॉस्पिटलचे बिल भरण्यास व प्रतिपूर्तीचा दावा करण्यास जबाबदर असता. पॉलिसी कंपनीला दाखल केली जाणारी सर्व वैद्यकीय कागदपत्रे अधिकृतच असावीत. यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी तिच्या अटी आणि नियमांचे पालन करून त्यांच्या ग्राहकाला योग्य ती सुविधा प्राप्त करून देते.
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसीची प्रीमियम गणना :
पुढे नोंद असलेल्या बाबींवरून यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रीमियमची गणना होते,
वय :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीच्या प्रीमियम गणनेत ‘वय’ ही बाब लक्षात घेतली जाते. आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर वयाचा प्रभाव पडतो. जसे तरुण लोक साहजिकच वृद्ध लोकांच्या तुलनेत कमी आजारी पडतात. म्हणून, हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी ते दाखल होण्याचे त्यांचे प्रमाण सुद्धा वृद्धांच्या तुलनेत कमी असते. तुमचे वय कमी असताना तुम्हाला पॉलिसीसाठी कमी प्रीमियम बसते तर जास्त वय असणाऱ्या लोकांना अधिक प्रीमियम भरावे लागते म्हणजे आपत्कालीन स्थितीत कंपनीकडून मिळणाऱ्या विमा लाभास ते पात्र होतात.
जीवनशैलीच्या सवयी :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीची पॉलिसी उतरवताना जीवनशैलीच्या काही सवयी जसे विशेष करून व्यसनाच्या सवयी ज्यांत सिगारेट ओढणे, दारू पिणे, तंबाखू खाणे, इतर अमली पदार्थांचे अति सेवन करणे, इत्यादीं गोष्टी आरोग्याच्या तक्रारी वाढवतात, या कारणाने आरोग्य चक्र बिघडते परिणामी, हॉस्पिटलचा उपचार ओढवतो. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रीमियम भरण्यास सांगितले जाते. तर कधी, अशा सवयींच्या कारणास्तव तुमची पॉलिसी कंपनीकडून मान्य करून घेतली जात नाही.
विम्याची रक्कम :
तसेच, विमा उतरवताना तुमच्या विमेच्या एकंदर रकमेवरून संबंधित पॉलिसीची प्रीमियम गणना होत असते. तुमच्या पॉलिसी प्रीमियमवर आणि तुम्हांला मिळणाऱ्या आपत्कालीन कव्हरेजवर त्या विमा रकमेचा परिणाम होत असतो. यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी तुम्हांला विस्तृत श्रेणीत विमा रकमेचे पर्याय ऑफर करते त्यानुसार तुम्ही निवडलेल्या तुमच्या सोयीच्या पॉलिसीवरून तुमचा जो काही मासिक, वार्षिक किंवा कोणताही प्रीमियम असेल ठरवला जातो.
विमाधारकांची संख्या :
विमाधारकांच्या संख्येवरून सुद्धा पॉलिसी प्रीमियमची गणना होत असते. यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीची पॉलिसी खरेदी करताना किंवा पॉलिसी नूतनीकरण करताना तुम्ही तुमच्या संबंधित व्यक्तींची संख्या वाढवत असाल तर तुमच्या पॉलिसी प्रीमियमवर त्याचा परिणाम होतो. आरोग्य विमा पॉलिसीचे जितके लाभार्थी असतील त्याच्या अनुसार पॉलिसी परत्वे प्रीमियम ठरतो.
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विम्याचे नेटवर्क हॉस्पिटल्स :
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीशी संलग्न असलेल्या नेटवर्क हॉस्पिटल्सची संख्या ५५०० पेक्षाही जास्त आहे. नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये उपचार घेताना त्या कंपनीच्या संबंधित विमाधारकांना सेवा फी द्यावी लागत नाही तर त्यांच्या पॉलिसीपरत्वे त्यांना कंपनी हॉस्पिटल खर्चाचा कव्हरेज कॅशलेस स्वरूपात देऊ करते. यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीची नेटवर्क हॉस्पिटल्स उत्तम आरोग्य सेवा प्रदान करतात. तसेच, कंपनी वेळोवेळी हॉस्पिटल्सचे नूतनीकरण करत असते. हॉस्पिटलच्या सेवा, व्यवस्थापन, कार्यक्षमता इत्यादिसर्व गोष्टींना कंपनी प्राधान्य देते. सोयीच्या उपचारासाठी नेटवर्क हॉस्पिटल्स महत्वाची भूमिका बजावतात. तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर जर तुम्ही विमा लाभ मिळवण्यासाठी पात्र असताल तर तिथे उपलब्ध असलेला कॅशलेस डाव्या संबंधीचा फॉर्म तुम्हांला भरावा लागतो आणि तो टिपीएकडे सबमिट करवा लागतो नंतर फॉर्म संमत झाल्यानंतर कंपनी डायरेक्ट नेटवर्क हॉस्पिटलचे बिल सेटल करते. यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीचे नेटवर्क हॉस्पिटल्स उत्तम दर्जेची सेवा रुग्णांना पुरवतात. त्यामुळे विमाधारकाने आरोग्य पॉलिसी खरेदी करताना नेटवर्क हॉस्पिटल जवळपास असल्याची खात्री करून घ्यावी जेणेकरून आपत्कालीन स्थितीत ते सोयीस्कर होईल.
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीशी संपर्क कसा साधावा ?
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी त्यांच्या ग्राहकांना संपर्क साधण्यासाठी विविध पर्याय देते. त्यांत ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्हींचा समावेश होतो. जसे तुम्ही कंपनीच्या १८०० २०० ५१४२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून चौकशी करू शकता तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता. तिथे उपलब्ध असलेले काही पर्याय तुमची मदत करतात. याशिवाय यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीच्या संबंधित एजंटशी बोलून अथवा जवळच्या कंपनी शाखेस भेट देऊन तुम्ही संपर्क साधू शकता.
यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
-
उत्तर: यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा पॉलिसीचे प्रीमियम तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकता. तुम्ही कंपनीच्या शाखेत भेट देऊन प्रीमियम पे करू शकता. ऑनलाइन पद्धतीने भरायचे असल्यास तुम्ही तुमच्या सोयीनुसार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच नेट बँकिंग द्वारे तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीचे प्रीमियम भरू शकता. ऑफलाइन पद्धतींमध्ये पेमेंट करायचे असल्यास तुम्ही शाखेला भेट देऊन रोख रक्कम किंवा धनादेश द्वारे पेमेंट करू शकता.
-
उत्तर: यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी तुम्हांला तुमच्या पॉलिसीची स्थिती तपासण्यासाठी सोयीचे पर्याय देते. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमच्या पॉलिसीची आयडी आणि पासवर्ड घालून संबंधित पॉलिसी पेजवर पोहोचून स्थिती तपासू शकता आणि हवी ती माहिती मिळवू शकता.
-
उत्तर: यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही पॉलिसी नूतनीकरण प्रक्रिया सहज पूर्ण करू शकता. जसे वेबसाइटवर गेल्यानंतर तुम्हांला तिथे पॉलिसी क्रमांक आणि पासवर्ड टाकून संबंधित वेब पेजवरून तुमच्या खात्यात प्रवेश घ्यावा लागेल. पुढे समोर प्रदर्शित होत असलेल्या पर्यायांपैकी नूतनीकरणाच्या बटणावर क्लिक करणे नंतर तुमचा पॉलिसी प्रीमियम पे करणे, इत्यादी बाबींचा पाठपुरावा करून तुम्ही तुमच्या आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण करू शकता.
-
उत्तर: यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीची दावा दाखल प्रक्रिया ही कॅशलेस आणि प्रतिपूर्ति अशा दोन पद्धतीची आहे. जर तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये सेवा घेत असताल तर तुम्हांला कॅशलेस दावा करण्यासाठी आधी तेथे उपलब्ध असलेला फॉर्म भरावा लागतो नंतर काही औपचारिक बाबींच्या पुर्तीनंतर विमा कंपनी तुमच्या कव्हरेज देऊ करते. आणि जर तुम्ही नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताल तर आधी तुम्हांला तेथील बिल सेटल करावे लागते नंतर तुम्ही यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीकडे प्रतिपूर्तिचा दावा दाखल करून खर्चाचा कव्हरेज मिळवू शकता. त्यासाठी सर्व अधिकृत हॉस्पिटल बिल आणि अहवाल तुम्हांला कंपनीला सादर करावी लागतात. अशाप्रकारे, तुम्ही विमा कंपनीकडे तुमचा आरोग्य विमा दाखल करून सुरक्षा मिळवू शकता.
-
उत्तर: यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनीचे कस्टमर्स पॉलिसी खरेदी करून काही फायद्यांचा लाभ घेऊ शकतात. उदाहरणार्थ विमाधारकांना आजीवन नूतनीकरणाची सोय, विमा रकमेची विस्तृत श्रेणी, निवासी हॉस्पिटलायझेशन कव्हर, इत्यादी फायद्यांचे लाभार्थी तुम्ही बनू शकता.
-
उत्तर: यूनिव्हर्सल सोम्पो आरोग्य विमा कंपनी तुम्हांला तुमची पॉलिसी रद्द करण्याचे पर्याय देते. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हांला काही नियम व अटींची पूर्ती करावी लागते. तर, पॉलिसी रद्द करण्याच्या प्रक्रियेत कंपनी त्यांच्या ग्राहकांना पंधरा दिवसांचा कालावधी देते. दरम्यान तुम्ही तुमची पॉलिसी कॅन्सल करू शकता. तो कालावधी संपल्यानंतर जर तुम्हांला पॉलिसी रद्द करायची असेल तर तुम्ही कंपनीला मेल करून किंवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करून देखील याबद्दल माहिती देऊन संबंधित प्रक्रिया करू शकता.