एसबीआय हेल्थ इन्श्युरन्स
एसबीआय हेल्थ इन्शुरन्सद्वारे पॉलिसीधारकाने केलेल्या हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी सर्वसमावेशक विमा कव्हरेज देऊ केले जाते.
Read More
एसबीआय जनरल हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा आढावा
एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इन्शुरन्स ऑस्ट्रेलिया ग्रुप (IAG) यांच्या दरम्यानचा एक संयुक्त उपक्रम आहे. एकूण भांडवलापैकी सुमारे 74% वाटा, एसबीआयच्या मालकीचा आणि उर्वरित 26% वाटा, आययएजीच्या मालकीचा आहे. 2013-14 या वर्षात एसबीआयला, जनरलने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने एसबीआयच्या 1.5 कोटी बचत बँक खातेधारकांना पर्सनल अॅक्सिडेंट इन्श्युरन्स कव्हर दिले आहे, याची पुष्टी करताना खूप अभिमान वाटतो.
एसबीआय जनरल इन्शुरन्सने देखील, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळपास 14,000 शाखांमध्ये आपली उपस्थिती प्रस्थापित केली आहे. एसबीआय जनरल इन्शुरन्सचे 68 दशलक्षाहून अधिक आनंदी ग्राहक आहेत आणि त्यांच्या उच्च क्लेम पेमेंट क्षमतेसाठी ICRA कडून आयएएए (iAAA) मान्यता देखील प्राप्त झाली आहे. एसबीआय हेल्थ इन्शुरन्सच्या 96% क्लेम सेटलमेंट रेशोमुळे, कंपनीला तिच्या क्लेम सेटलमेंटबद्दल अभिमान आहे.
*सर्व बचत, IRDAI मंजूर विमा योजनेनुसार विमा कंपनीद्वारे देऊ केली जाते. मानक नियम आणि अटी लागू.
एका दृष्टीक्षेपात एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी
वैशिष्ट्ये |
तपशील |
नेटवर्क हॉस्पिटल्स |
6000+ |
खर्च झालेल्या दाव्याचे रेशो |
52% |
हाताळण्यात आलेले दावे |
रु. 110 अब्ज |
नूतनीकरणयोग्यता |
आयुष्यभर |
एसबीआय नेटवर्क शाखा |
24000+ |
तुमच्या आवडीचे एसबीआय हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज निवडा
एसबीआय हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सचे फायदे
एसबीआय जनरल हेल्थ इन्शुरन्स कंपनीने त्यांच्या वैद्यकीय विमा योजना काही विशिष्ट वैशिष्ट्यांसह आणि फायद्यांसह निर्माण केल्या आहेत, ज्यांचा ग्राहक लाभ घेऊ शकतात. वैद्यकीय खर्च, तसेच विविध आजारांवरील उपचारांचा खर्च सतत वाढत आहे; त्यामुळे हेल्थ इन्श्युरन्स योजना खरेदी करणे, आधुनिक काळातील आरोग्य सेवेच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाची बाब बनली आहे. एसबीआय हेल्थ इन्श्युरन्स योजनेद्वारे तुम्हाला फायदेशीर आरोग्य सेवा आणि आर्थिक सुरक्षिततेची भावना देऊ केली जाते. खाली एसबीआय हेल्थ इन्श्युरन्स आरोग्य विमा योजना खरेदी करण्याचे काही प्रमुख फायदे दिलेले आहेत -
- विमा कंपनीद्वारे विविध आरोग्य विमा योजना देऊ केल्या जातात, ज्यात मूलभूत आजार आणि OPD खर्चापासून गंभीर आजारांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असतो.
- याद्वारे विमाधारकांना विविध प्रकारचे आजार आणि वैद्यकीय खर्चासाठी सर्वसमावेशक कव्हरेज देऊ केले जाते.
- एसबीआय मेडिक्लेम पॉलिसीद्वारे रु. 50,000 ते रु. 5 लाख कव्हरेज पर्यायांची विस्तृत श्रेणी देऊ केली जाते
- 45 वर्षांपर्यंत वयाच्या अर्जदारांसाठी पूर्व-वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही
- याद्वारे मेट्रो आरोग्य विमा योजना, सेमी-मेट्रो योजना आणि रेस्ट ऑफ इंडियासारखे लवचिक योजना पर्याय देऊ केले जातात.
- एसबीआय हेल्थ प्लॅन्सद्वारे फॅमिली फ्लोटर पॉलिसीसह एकाच प्लॅन अंतर्गत तुमची अवलंबून असलेली मुले, पालक, जोडीदार आणि स्वतःसह संपूर्ण कुटुंब कव्हर करण्याचा पर्याय देऊ केले जातात.
- हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरच्या खर्चाची भरपाई केली जाते
- प्रत्येक 4 दावा-मुक्त वर्षांनी मोफत आरोग्य तपासणी करून घ्या
- विमा कंपनीद्वारे आयुष्यभराच्या नूतनीकरणाची तरतूद देऊ केली जाते
- भारतातील 6000 हून अधिक नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस उपचार देखील उपलब्ध आहेत
- खोलीचे शुल्क आणि सल्लामसलत शुल्कावरील उप-मर्यादा काढून टाकण्यासारखे अतिरिक्त कव्हर घेऊन, कव्हर वाढवण्याची तरतूद आहे.
- आयकर कायदा, 1961 च्या कलम 80डी अंतर्गत एसबीआय हेल्थ इन्श्युरन्सच्या प्रीमियमवर कर बचत लाभ मिळू शकतात
एसबीआय हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे प्रकार
एसबीआय जनरल इन्शुरन्स, आपल्या ग्राहकांच्या विविध आरोग्य विम्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या वैद्यकीय विमा पॉलिसी देऊ करते. पॉलिसीचे कव्हरेज आणि मर्यादा पडताळून पाहिल्यानंतर, तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बहुतांश गरजा पूर्ण करणारी एखादी पॉलिसी निवडू शकता:
- एसबीआय आरोग्य प्रीमियर पॉलिसी
- एसबीआय आरोग्य प्लस पॉलिसी
- एसबीआय आरोग्य टॉप अप पॉलिसी
- एसबीआय हॉस्पिटल डेली कॅश इन्श्युरन्स पॉलिसी
- एसबीआय क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसी
- एसबीआय ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी
- एसबीआय लोन इन्श्युरन पॉलिसी
- एसबीआय रिटेल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी
-
एसबीआय आरोग्य प्रीमियर इन्श्युरन्स पॉलिसी, व्यक्ती तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वैद्यकीय खर्चासाठी कव्हर करण्यासाठी निर्माण केली गेली आहे. या आरोग्य योजनेची आवश्यक वैशिष्ट्ये खाली सूचीबद्ध आहेत:
- रु. 10,00,000 पासून सुरू होणार्या आणि रु 30,00,000 पर्यंत पॉलिसींचे विस्तृत कव्हरेज
- ही पॉलिसी इन्डिव्हिज्युअल / फॅमीली आणि फ्लोटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. फॅमीली प्लॅनसाठी कुटुंबात विमाधारक, त्याची / तिचा जोडीदार, मुले, आईवडील आणि सासरे यांचा समावेश असतो. फॅमिली फ्लोटरमध्ये स्वत:चा, जोडीदाराचा आणि 23 वर्षापर्यंतच्या आश्रित मुलांचा समावेश असतो.
- प्रवेशाचे किमान आणि कमाल वय, 3 महिने आणि 65 वर्षे आहे
- 55 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या आणि ज्यांचा कोणताही वैद्यकीय इतिहास नाही, अशा लोकांसाठी कोणत्याही वैद्यकीय चाचण्या आवश्यक नाहीत
- 1, 2 किंवा 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी खरेदी केली जाऊ शकते
- हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च, अनुक्रमे 60 आणि 90 दिवसांसाठी समाविष्ट आहे
- पॉलिसी घेतल्यानंतर सुरुवातीच्या 9 महिन्यांच्या कालावधीनंतर मातृत्व खर्चास कव्हर केले जाते.
- या योजनेद्वारे 1 लाख रुपयांपर्यंत एअर अॅम्ब्युलन्सचे कव्हर देखील देऊ केले जाते
- 142-दिवसीय काळजी खर्च आणि अगदी अवयव दात्याच्या खर्चासाठी विमा उतरविला जातो
- एसबीआय आरोग्य विमा दाव्यामध्ये ऍम्ब्युलन खर्च (एअर ऍम्ब्युलन्ससह) कव्हर केला जातो. रु. 1,00,000
- कमाल 50% च्या अधीन राहून, प्रत्येक दावा-मुक्त वर्षासाठी विम्याच्या रकमेच्या 10% चा संचयी बोनस
- मानक पाश्चात्य औषधांव्यतिरिक्त, तिच्याद्वारे पारंपारिक आयुष (आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) वैद्यकीय उपचारांसाठी कव्हरेज देखील देऊ केले जाते. हे पर्यायी उपचार, सरकारी रुग्णालयातच केले गेले पाहिजेत
- आरोग्य तपासणी फायद्यांची प्रतिपूर्ती रु. 5,000 पर्यंत, 4 वर्षांपर्यंत कोणताही दावा केल्यास
- कोणत्याही प्रकारे दाव्यामुळे रक्कम कमी झाल्यास, अतिरिक्त प्रीमियम न घेण्याची गरज पडता, संपूर्ण विम्याची रक्कम स्वयंचलितपणे पुनर्संचयित (रीइन्स्टेट) करते
- आयकर कायद्याच्या कलम 80डी अंतर्गत कर सवलत देऊ करते
- कव्हरचे नूतनीकरण करण्यासाठी पॉलिसीची मुदत संपल्यापासून 30 दिवसांचा वाढीव कालावधी (ग्रेस पिरिअड) आहे
योजनेचा प्रकार |
इन्डिव्हिज्युअल / फॅमीली फ्लोटर |
विम्याची रक्कम |
रु. 10 लाख - 30 लाख रुपये |
पॉलिसीची मुदत |
1, 2, आणि 3 वर्षे |
वयाचा निकष |
3 महिने ते 65 वर्षे |
-
एसबीआय आरोग्य प्लस पॉलिसी ही, एसबीआय जनरल हेल्थ इन्शुरन्सची एक मेडिक्लेम पॉलिसी आहे, जी OPD आणि हॉस्पिटलायझेशनच्या वाढत्या खर्चाला कव्हर करते आणि पॉलिसीधारकाच्या खिशातून होणारा खर्च कमी करते. या धोरणाची आवश्यक वैशिष्ट्ये खाली सूचीबद्ध आहेत:
- एसबीआय आरोग्य प्लस पॉलिसी दोन कव्हरेज पर्याय देऊ करते: इन्डिव्हिज्युअल आणि फॅमीली फ्लोटर बेसिस
- ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी किमान आणि प्रवेशाचे कमाल वय, अनुक्रमे 3 महिने आणि 65 वर्षे आहे
- एसबीआय आरोग्य प्लस पॉलिसीमध्ये कोणतेही एग्झिट एज नाही
- एसबीआय आरोग्य प्लसद्वारे रु. 1 लाख, रु. 2 लाख ते रु. 3 लाख पर्यंतचे विम्याचे पर्याय देऊ केले जातात
- या पॉलिसीचा प्रीमियम, 1, 2 किंवा 3 लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी थेट वार्षिक 8,900 रुपये, 13,350 रुपये किंवा रुपये 17,800 आहे.
- पॉलिसीद्वारे, वय, प्रीमियम आणि कौटुंबिक प्रकार यासारख्या घटकांच्या आधारे, OPD प्रतिपूर्ती देऊ केली जाते
- पॉलिसीद्वारे, कार्यकालाचे तीन पर्याय देऊ केले जातात- 1 वर्ष, 2 वर्षे आणि 3 वर्षे
- प्रसूती खर्चावर कोणतीही उप-मर्यादा नाही, पॉलिसीच्या संपूर्ण रकमेसाठी त्यांना कव्हर केले जाते. पॉलिसी घेतल्यानंतर 9 महिन्यांनंतर प्रसूतीचा खर्च झाला असेल, तर तिच्याद्वारे OPD लाभांतर्गत मातृत्व खर्च देखील केला जातो. 55 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांचा कोणताही वैद्यकीय इतिहास नसल्यास, पॉलिसीला कोणत्याही वैद्यकीय चाचण्यांची आवश्यकता नसते
- पॉलिसीद्वारे अनुक्रमे 60 आणि 90 दिवसांसाठी हॉस्पिटलायझेशनपूर्वीचा आणि नंतरचा खर्च कव्हर केला जातो.
- पॉलिसीद्वारे 142 OPD (डे केअर) प्रक्रियेपासून संरक्षण केले जाते
- यादवे निवासी हॉस्पिटलायझेशन आणि अॅम्ब्युलन्स खर्चाला देखील कव्हर केले जाते
- तथापि, त्याद्वारे योजनेच्या पहिल्या 4 वर्षांसाठी आधीपासून अस्तित्वात असलेले आजार आणि कव्हरच्या पहिल्या वर्षासाठी काही विशिष्ट आजारांना कव्हर केले जात नाही.
- विमाधारक व्यक्ती, आयकर कायद्याच्या कलम 80डी अंतर्गत कर लाभाचा दावा करू शकते
योजनेचा प्रकार |
इन्डिव्हिज्युअल / फॅमीली फ्लोटर |
विम्याची रक्कम |
रु. 1,2 आणि 3 लाख |
वयाचा निकष |
3 महिने ते 65 वर्षे |
पॉलिसीची मुदत |
1, 2, आणि 3 वर्षे |
-
एसबीआय आरोग्य टॉप अप ही, एसबीआयची एक मेडिक्लेम पॉलिसी आहे, जी मूलभूत विमा योजनेच्या व्यतिरिक्त अपघात किंवा आजारांसारख्या अनपेक्षित गंभीर घटनांच्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी आदर्श आहे. मोठ्या टॉप अप कव्हरसह, ही मेडिक्लेम पॉलिसी व्यक्ती आणि कुटुंबाला (फ्लोटर प्लॅन अंतर्गत), आजकाल हॉस्पिटलायझेशन आणि बरे होण्याच्या मोठ्या खर्चाची पूर्तता करण्यास मदत करते.
या पॉलिसीचे महत्वाचे फायदे खाली सूचीबद्ध केले आहेत:
- 55 वर्षांपर्यंतच्या लोकांसाठी कोणत्याही वैद्यकीय चाचण्यांची आवश्यकता नाही
- रु. 1,00,000 पासून, रु. 1,00,000 ते रु. 10,00,000 पर्यंत वजावटीच्या पर्यायासह, रु. 1,00,000 आणि रु. 50,00,000 पर्यंतचे मोठे कव्हरेज देऊ करते. वजावटयोग्य पर्याय 1 लाखाच्या पटीत उपलब्ध आहे
- यात 1, 2 किंवा 3 वर्षांची पॉलिसीची मुदत आहे, 2 वर्षांच्या पॉलिसीसाठी प्रीमियममध्ये 5% सूट आणि 3-वर्षीय योजनेसाठी 7.5% सूट आहे
- अॅम्ब्युलन्स खर्चासाठी रु. 5,000 ची प्रतिपूर्ती देऊ करते
- आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) यासारख्या पर्यायी उपचारांना कव्हर करते
- आयकर कायद्याच्या कलम 80डी अंतर्गत कर कपात देऊ करते
- एसबीआय हेल्थ इन्श्युरन्सच्या नूतनीकरणासाठी पॉलिसी कालावधीच्या शेवटच्या दिवसापासून 30 दिवसांचा वाढीव कालावधी (ग्रेस पिरिअड) आहे
टीप: ही योजना इन्डिव्हिज्युअल / फॅमिली आणि फॅमिली फ्लोटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात फॅमिली प्लॅनमध्ये विमाधारक, त्याची / तिचा जोडीदार आणि आश्रित मुलांव्यतिरिक्त आईवडील आणि सासू-सासरा यांचा समावेश असतो. फॅमिली फ्लोटर प्लॅनमध्ये आई-वडील किंवा सासू-सासरा यांचा समावेश नसतो.
-
यया एसबीआय मेडिक्लेम पॉलिसीद्वारे तुम्हाला हॉस्पिटलायझेशनवर दैनंदिन फायदे देऊ केले जातात आणि ज्यांना मूलभूत योजनांमध्ये कव्हर केले गेले नाही असा प्रवासाचा खर्च, अन्न इत्यादीसाठी अतिरिक्त कव्हर देऊ केले जाते. एसबीआय हॉस्पिटल डेली कॅश इन्शुरन्स पॉलिसी, तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी निश्चित लाभ देऊ करते. अशाप्रकारे, योजनेमध्ये असे विविध खर्च समाविष्ट आहेत, जे सहसा पारंपारिक धोरणांमध्ये समाविष्ट नसतात.
या धोरणाची महत्वाची वैशिष्ट्ये खाली सूचीबद्ध आहेत:
- प्रवेशाचे वय प्रौढांसाठी 18 ते 65 वर्षे आहे आणि 3 महिने वयाच्या मुलांना कव्हर केले जाऊ शकते
- या पॉलिसीद्वारे 2000 ते 4000 रुपयांपर्यंत दैनिक रोख लाभ देऊ केला जातो
- ICU हॉस्पिटलायझेशन कव्हर हे दररोजच्या कव्हरपेक्षा दुप्पट असते
- या योजनेअंतर्गत, 4 दैनिक रोख लाभ पर्याय उपलब्ध आहेत- रु. 500, रु. 1000, रु. 1500 आणि रु. 2000
- अपघाती हॉस्पिटलायझेशनचा दैनिक रोख लाभ देऊ केला जातो
- कॉन्व्हॅलेसंस लाभ, निश्चित एकरकमी रकमेमध्ये दिला जातो
- फ्री लुक कालावधीच्या 15 दिवसांच्या आत तुम्ही सहजपणे परतावा (रिफंड) मिळवू शकता
- पॉलिसीद्वारे 30 दिवस आणि 60 दिवसांचा लवचिक कव्हरेज कालावधी देऊ केला जातो
- आयकर कायद्याच्या कलम 80डी अंतर्गत कर बचत फायदे
योजनेचा प्रकार |
इन्डिव्हिज्युअल |
विम्याची रक्कम |
दैनिक आधारावर |
पॉलिसीची मुदत |
30 दिवस आणि 60 दिवस |
-
एसबीआय क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे तेरा सर्वात जीवघेण्या आजारांविरूद्ध कव्हरेज देऊ केले जाते. उपचाराचा अत्याधिक खर्च, कोणाचीही बचत हळूहळू संपवून टाकू शकतो. पण या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये उपचाराच्या खर्चाची काळजी घेतली जाते.
या पॉलिसीचे खालील फायदे खाली दिले आहेत:
- या पॉलिसीद्वारे 13 गंभीर आजारांपर्यंतच्या खर्चाची परतफेड केली जाते.
- हा प्लॅन खरेदी करण्यासाठी कमाल वय 65 वर्षे आणि किमान 18 वर्षे आहे
- तुम्ही 1 वर्ष आणि 3-वर्षीय योजनाच्या पर्यायांमधून निवडू करू शकता
- विम्याची रक्कम 50 लाख रुपयांपर्यंत आहे
- 45 वर्षांपर्यंत प्री-मेडिकल स्क्रीनिंग आवश्यक नाही
- पॉलिसीद्वारे खालील गंभीर आजारांना कव्हर केले जाते: कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, अर्धांगवायू, कोमा, संपूर्ण अंधत्व, पक्षाघात, प्राथमिक फुफ्फुसीय धमनी उच्च रक्तदाब, कोरोनरी धमनी बाय-पास ग्राफ्ट्स, मल्टिपल स्क्लेरोसिस, मायोकार्डियल इन्फ्रक्शन (हृदयविकाराचा पहिला झटका), हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया, एओर्टा ग्राफ्ट शस्त्रक्रिया, आणि अवयवदान. हे सर्व्हायव्हल पिरिअड आणि किमान मूल्यांकन कालावधीच्या कलमाच्या अधीन आहे
- या योजनेमध्ये 15 दिवसांचा फ्री लुक कालावधी देखील उपलब्ध आहे
योजनेचा प्रकार |
इन्डिव्हिज्युअल |
विम्याची रक्कम |
रु. 2 लाख ते 50 लाख |
प्रवेशाचे वय |
65 वर्षांपर्यंत |
कव्हर करण्यात आलेल्या गंभीर आजारांची संख्या |
13 |
पॉलिसीची मुदत |
1 आणि 3 वर्षे |
-
एसबीआय जनरलची ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून वाचवण्यात मदत केली जाते, त्यामुळे दर्जेदार आरोग्यसेवा सुनिश्चित केली जाते आणि प्रक्रिया तणावमुक्त केली जाते. या धोरणाची महत्वाची वैशिष्ट्ये खाली सूचीबद्ध आहेत:
वैशिष्ट्ये आणि फायदे:
- मुलासाठी प्रवेशाचे किमान वय 3 महिने आणि प्रवेशाचे कमाल वय 30 वर्षे आहे
- प्रौढांसाठी आरोग्य विमा संरक्षणासाठी प्रवेशाचे वय 18 ते 65 वर्षे आहे
- विम्याच्या रक्कमेची मर्यादा रु. 1 लाख ते रु. 5 लाख आहे
- या योजनेत वैद्यकीय व्यवसायी आणि तज्ञांचे शुल्क यांना कव्हर केले जाईल
- खोली, बोर्डिंग आणि नर्सिंग शुल्क, ICU शुल्क यांना देखील कव्हर केले जाईल
- पॉलिसीद्वारे हॉस्पिटलायझेशननंतर 60 दिवस आणि हॉस्पिटलायझेशनपूर्वी 30 दिवस, हॉस्पिटलायझेशनच्या अगोदरच्या आणि नंतरच्या खर्चास कव्हर केले जाते.
- एकाधिक कव्हरेज पर्याय देऊ केले जातात - विम्याच्या रकमेसाठी इन्डिव्हिज्युअल आणि फॅमिली फ्लोटर
- अॅम्ब्युलन्सचे शुल्कही भरले जाते
- स्वीकार्य दाव्याच्या मर्यादेपर्यंत 10% को-पेमेंट
- डे केअर शस्त्रक्रिया, डोळ्यांचे उपचार, डायलिसिस, टॉन्सिलेक्टॉमी, केमोथेरपी, रेडिओथेरपी इत्यादींवर झालेल्या खर्चाची भरपाई दिली जाते.
- निवसी हॉस्पिटलायझेशनचे खर्च देखील समाविष्ट आहेत
- डायलिसिस, ऑक्सिजन, औषधे, रेडिओथेरपी, ऑपरेशन थिएटर, सर्जिकल उपकरणे, केमोथेरपी, पेसमेकर या बाबींसाठी लागलेला अभिन्न खर्च.
- निर्दिष्ट रोगांच्या बाबतीत एक वर्ष प्रतीक्षा कालावधी लागू आहे
- पूर्व-अस्तित्वात असलेल्या रोगांचे कव्हरेज 4 वर्षांनंतर देऊ केले जाते
- एसबीआय आरोग्य विमा प्रीमियमवर कलम 80D अंतर्गत कर बचत लाभ देऊ केले जातात
योजनेचा प्रकार |
इन्डिव्हिज्युअल / फॅमीली फ्लोटर |
वयाचा निकष |
18 ते 65 वर्षे |
प्री-मेडिकल तपासणी |
65 वर्षांपर्यंत आवश्यक नाही |
विम्याची रक्कम |
रु. 1 लाख - रु. 5 लाख |
-
एसबीआय लोन इन्श्युरन्स ही, एसबीआयची एक अनोखी मेडिक्लेम पॉलिसी आहे, जी गंभीर आजार, वैयक्तिक अपघात आणि रोजगार गमावल्यामुळे उद्भवलेल्या कोणत्याही दुर्दैवी परिस्थितीत तुमचे गृहकर्ज भरण्याच्या तणावापासून मुक्त होण्यासाठी निर्माण केली गेली आहे.
खाली पॉलिसीचे खालील फायदे आणि वैशिष्ट्ये दिलेली आहेत:
- एसबीफाय लोन इन्शुरन्स पॉलिसी 3 वर्षांपर्यंत घेता येते
- 1 कोटी रुपयांच्या विम्याच्या रकमेपर्यंत, प्री-मेडिकल तपासणी आवश्यक नाही. 55 वर्षापर्यंत वैद्यकीय तपासणी आवश्यक नाही.
- प्रवेशाचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 60 वर्षे आहे
- या योजनेद्वारे कायमस्वरूपी अपंगत्व कव्हर देऊ करण्यात येते
- ही पॉलिसी जॉबच्या नुकसानी विरुद्ध कव्हर देऊ करते- कमाल 3 ईएमआयची भरपाई केली जाईल
- या योजनेद्वारे कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, अर्धांगवायू, कोमा, संपूर्ण अंधत्व, पक्षाघात, प्राथमिक फुफ्फुसाच्या धमनी उच्च रक्तदाब, एओर्टा ग्राफ्ट सर्जरी, कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट्स, मल्टिपल स्क्लेरोसिस, मायोकार्डियल इन्फेक्शन (प्रथम हृदयविकाराचा झटका), हृदयविकाराचा झटका, अवयव प्रत्यारोपण अशा गंभीर आजारांचे कव्हर सुलभ केले जाते
- डोळे गमावणे, शारीरिक विभक्तपणा (फिजिकल सेपरेशन) किंवा दोन्ही हात किंवा पाय यांचे कायमचे अपंगत्व येणे अशा बाबतींत 100% भरपाई दिली जाते.
- फ्री लुक कालावधी उपलब्ध आहे
- एसबीआय कर्ज विमा पॉलिसीमध्ये नोंदणी करण्यासाठी प्री-मेडिकल स्क्रीनिंग आवश्यक नाही
- अपघाती मृत्यूसाठी कव्हरेज देऊ केले जाते
प्रवेशाच्या वयाचा निकष |
18 ते 60 वर्षे |
विम्याची रक्कम |
रु. 1 कोटी |
प्रतीक्षा कालावधी |
90 दिवस |
प्री-मेडिकल तपासणी |
45 वर्षांपर्यंत आवश्यक नाही |
-
एसबीआय रिटेल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ही एक आरोग्य विमा पॉलिसी आहे, जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला, सर्वोत्तम वैद्यकीय उपचारांचा लाभ उपलब्ध करून देण्यात मदत करते. कुटुंबातील सर्व सदस्यांना एकाच पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाऊ शकते. पॉलिसीधारक मिळवू शकणारी वैशिष्ट्ये आणि फायदे खाली सूचीबद्ध करण्यात आली आहेत:
वैशिष्ट्ये आणि फायदे:
- पॉलिसीमध्ये अर्जदारांचा कोणताही वैद्यकीय इतिहास नसल्यास 45 वर्षे प्रीमेडिकल तपासणी करणे आवश्यक नाही.
- विशेष वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिक योजनांमधून एक योजना निवडण्याचा पर्याय: मेट्रो योजना, सेमी मेट्रो योजना आणि रेस्ट ऑफ इंडिया
- पॉलिसीद्वारे रुग्णालयाच्या खोलीचे भाडे, औषधांचा खर्च, ICU शुल्क, इतर खर्च, ओटी शुल्क आणि डॉक्टरांचे शुल्क यांना कव्हर केले जाते.
- याद्वारे अनुक्रमे 30 आणि 60 दिवसांसाठी हॉस्पिटलायझेशनपूर्वीचा आणि नंतरच्या खर्चास देखील कव्हर केले जाते
योजनेचा प्रकार |
फॅमीली फ्लोटर |
विम्याची रक्कम |
रु. 50,000- रु. 5 लाख |
अॅड-ऑन कव्हर्स |
उपलब्ध |
प्री-मेडिकल तपासणी |
रु. 2500 पर्यंत |
एसबीआय हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर
एसबीआय हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन प्रीमियम कॅल्क्युलेटर द्वारे पॉलिसीच्या तुलनेस अधिक सोयीस्कर बनवले जाते. फक्त तुमचे वय, पॉलिसी तपशील, विम्याची रक्कम, पॉलिसीचा कालावधी, राहण्याचे शहराचे नाव टाकून, तुम्ही काही क्लिक्समध्ये वेगवेगळे प्रीमियम दर पाहू शकता.
एसबीआयच्या विविध हेल्थ प्लॅन्सचे प्रीमियम जाणून घेण्यासाठी तुम्ही पॉलिसीबझारच्या वेबसाइटवर ऑनलाइन प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरू शकता.
एसबीआय मेडिक्लेम पॉलिसीद्वारे काय कव्हर केले जाते?
एसबीआय मेडिक्लेम पॉलिसीद्वारे खालील खर्चांना कव्हर केले जाते, जे निवडलेल्या योजनेच्या आधारावर बदलू शकतात:
- खोली आणि सेवा शुल्क, बोर्डिंग आणि नर्सिंग चार्जेससह हॉस्पिटलायझेशन खर्च इ.
- सल्लागार आणि तज्ञांकडून आकारले जाणारे शुल्क
- भूल, शस्त्रक्रिया उपकरणे, रक्त, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटर इत्यादींवर लागणारे शुल्क.
- हॉस्पिटलायझेशनपूर्व आणि हॉस्पिटलायझेशननंतरचा खर्च, रुग्णवाहिका शुल्क, मोफत वैद्यकीय तपासणी (दर 4 नॉन-क्लेम वर्षांनी)
- 24 तासांपेक्षा कमी हॉस्पिटलायझेशन आवश्यक असलेल्या, निर्दिष्ट दिवसाच्या शस्त्रक्रियांसाठी कव्हरेज.
एसबीआय मेडिक्लेम पॉलिसीच्या अंतर्गत काय कव्हर केले जात नाही?
एसबीआयच्या मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत कव्हर न करण्यात आलेल्या परिस्थिती खाली सूचीबद्ध केल्या आहेत आणि खालील परिस्थितीत तुमचे दावे पूर्ण करण्यास विमा कंपनी जबाबदार नाही:
- 2 वर्षे पूर्ण होण्याआधी, पॉलिसी सुरू झाल्याच्या दिनांकापासून कोणत्याही पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय स्थितीसाठी कोणत्याही प्रकारच्या दुखापती, आजार किंवा उपचारांमुळे उद्भवणारे कोणतेही दावे
- विमा पॉलिसी सुरू झाल्यापासून सुरुवातीच्या 30 दिवसांत झालेला कोणताही उपचार किंवा हॉस्पिटलायझेशन खर्च
- पॉलिसी सुरू होण्याच्या दिनांकापासून 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी, विशिष्ट आजारांमुळे किंवा हर्नियासाठी आवश्यक असलेल्या उपचारांमुळे उद्भवणारा कोणताही दावा
- पॉलिसी सुरू होण्याच्या दिनांकापासून 2 वर्षे प्रतीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी हिस्टेरेक्टॉमी, मोतीबिंदू इ.चे उपचार
- पॉलिसी सुरू झाल्यापासून प्रतीक्षा कालावधी पूर्ण होण्याआधी, संयुक्त बदली शस्त्रक्रियांमधून उद्भवणारे दावे (हे अपघाती प्रकरण असल्याशिवाय)
- अरोमाथेरपी, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर, ऑस्टिओपॅथी, रिफ्लेक्सोलॉजी आणि निसर्गोपचार इत्यादी पर्यायी उपचारांवर होणारा खर्च.
- गर्भाशयाच्या किंवा अतिरिक्त-गर्भाशयाच्या गर्भधारणेसाठी आणि सिझेरियन प्रसूतीसह आणि प्रसूतीपूर्व आणि प्रसवोत्तर उपचारांच्या कोणत्याही स्वरूपासह बाळंतपणासाठी आवश्यक उपचार
- कोणत्याही प्रकारचे जन्मजात रोग किंवा विकार यांना एसबीआयच्या मेडिकल इन्श्युरन्स प्लॅनमध्ये कव्हर केले जात नाही
- AIDS आणि HIV संसर्गासाठी आवश्यक उपचार
- मादक पदार्थांचा गैरवापर आणि नशा किंवा मद्यपानाशी संबंधित लक्षणे
एसबीआय हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स कसे खरेदी करावे?
एसबीआय हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स हे, ऑनलाइन, ऑफलाइन आणि फोन कॉल अशा अनेक माध्यमातून सहज खरेदी करता येतात. तुम्हाला एसबीआय हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करायची असल्यास, असे करण्याचे मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:
फोन कॉल करून-
- ज्या व्यक्ती एसबीआय हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, ते फक्त पॉलिसी बाजारच्या विक्री हेल्पलाइनवर कॉल करू शकतात.
- तुम्ही तुमच्या विमा गरजा आणि आवश्यकतांबद्दल ग्राहक सेवा प्रतिनिधीशी बोलू शकता
- एकदा तुम्ही सर्व तपशील शेअर केल्यावर, ते ईमेलवर तुमच्यासोबत कोट्स शेअर करतील
- तुम्ही पॉलिसी निवडू शकता आणि एकदा तुम्ही एखादी पॉलिसी निश्चित केल्यानंतर पेमेंट करू शकता
ऑनलाइन-
- पॉलिसीबझारच्या वेबसाइटवर जा आणि एसबीआय हेल्थ इन्शुरन्स प्लॅन निवडा
- कंपनीच्या वेबसाइटवर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्या
- ऑनलाइन एसबीआय हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी प्लॅन्स, बाजारच्या वेबसाइटवरून संबंधित योजनांसाठी नमूद केलेल्या आता खरेदी टॅबवर क्लिक करून, लगेच ऑनलाइन खरेदी केल्या जाऊ शकतात.
- एकदा तुम्ही तपशील भरल्यानंतर तुम्ही त्यांच्या साइटवर वेगवेगळ्या योजनांची तुलना करू शकता आणि तुमची कोणतीही पूर्व-अस्तित्वातील स्थिती नसल्यास किंवा 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास, तुम्ही पेमेंट करू शकता.
- अधिक स्पष्टतेसाठी तुम्ही कॉल बॅकची विनंती देखील करू शकता
- ते योजनांचे ऑनलाइन नूतनीकरण करण्यासाठी सुलभ प्रवेश देखील देऊ करतात
ऑफलाइन-
शेवटी, तुम्ही एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या शाखांना देखील भेट देऊ शकता किंवा आवश्यकतेनुसार एसबीआय मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करण्यासाठी एजंटशी संपर्क साधू शकता.
एसबीआय हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नूतनीकरण प्रक्रिया
एसबीआय हेल्थ इन्शुरन्स प्लॅन, ऑनलाइन नूतनीकरण करण्यास अगदी सोपे आणि सहज आहेत. स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आईवडिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्सचे ऑनलाइन नूतनीकरण करण्यासाठी फक्त या सोप्या चरणांचे अनुसरण करा. ऑनलाइन नूतनीकरणामुळे वेळ आणि प्रयत्न दोन्ही वाचतात. तुमच्या एसबीआय हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे ऑनलाइन नूतनीकरण करण्यासाठी तुम्ही अनुसरण करू शकता अशा पायऱ्या खाली नमूद केल्या आहेत-
- पॉलिसीबाजारच्या साइटवर जा आणि पॉलिसी नूतनीकरण पर्याय निवडा
- तुमच्या एसबीआय हेल्थ इन्शुरन्स प्लॅनचा तपशील पुरवा
- एकदा तुम्ही विम्याचा तपशील टाकल्यानंतर, तुम्ही विमा प्रीमियमची किंमत पाहू शकाल
- तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करा आणि तुम्ही एनईएफटी देखील करू शकता
- त्यानंतर तुम्ही नूतनीकरण केलेली पॉलिसी डाउनलोड करू शकता आणि एक प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवू शकता
एसबीआय हेल्थ इन्शुरन्सच्या दाव्य्याची प्रक्रिया
एसबीआय हेल्थ इन्शुरन्सच्या दाव्य्याची प्रक्रिया सुरू करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे:
- एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीला कॉल करून किंवा ईमेलवरून कळवा
- मूळ वैद्यकीय कागदपत्रांच्या प्रतीसह रीतसर स्वाक्षरी केलेला आणि भरलेला दाव्याचा फॉर्म सादर करा
- एकदा कागदपत्रे सादर केल्यानंतर विमा कंपनी 30 दिवसांच्या आत दावे निकाली काढेल
- पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार तुमचा आरोग्य विमा दावा मंजूर केला किंवा नाकारला जाईल
- कॅशलेस हॉस्पिटलायझेशनसाठी, प्री-ऑथोरायझेशन विनंतीला विमा कंपनी किंवा हॉस्पिटलमधील टीपीए डेस्कने मंजूरी देणे आवश्यक आहे.
- नियोजित हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत, विमा कंपनीला आगाऊ माहिती देणे आवश्यक आहे
- आपत्कालीन हॉस्पिटलायझेशनसाठी, तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून 24 तासांच्या आत विमा कंपनीला कळवू शकता
एसबीआय हेल्थ इन्शुरन्सच्या दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
एसबीआय जनरल हेल्थ इन्श्युरन्सच्या दाव्यावर प्रक्रिया करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
- रीतसर स्वाक्षरी केलेला आणि भरलेला दाव्याचा फॉर्म
- केवायसी फॉर्म
- एसबीआय हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची प्रत
- हॉस्पिटल डिस्चार्जचा मूळ सारांश
- प्रिस्क्रिप्शन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पत्र
- बिले / पावत्या / वैद्यकीय अहवाल
- मृत्यू प्रमाणपत्र / पोस्टमार्टम अहवाल (अपघाती मृत्यूच्या बाबतीत प्रमाणित केलेले)
- पॅन कार्ड / पत्त्याचा पुरावा / इतर कागदपत्रे (जसे प्रकरण असेल तसे)
- आय.आर. कॉपी (अपघाती प्रकरणे)
खातेधारकांसाठी एसबीआय हेल्थ इन्श्युरन्स:
एसबीआय जनरल हेल्थ इन्शुरन्सद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया मधील खातेदारांसाठी ही विशेष पॉलिसी देऊ केली जाते:
- आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये, एसबीआय बँकेच्या सहकार्याने एसबीआय जनरल इन्शुरन्सने 1.5 कोटी बचत बँक खातेधारकांना वैयक्तिक अपघात विमा देऊ केला. एसबीआय खातेधारक, इन्डिव्हिज्युअल आणि ग्रुप हेल्थ इन्शुरन्स योजना देखील खरेदी करू शकतात
- पॉलिसी खरेदीसाठी वयाचा निकष, प्रौढांसाठी 18-65 वर्षे आणि मुलांसाठी 3 महिने-18 वर्षे आहे
- निर्दिष्ट रोगासाठी 1 वर्षाचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी आहे.
- एसबीआय ग्रुप हेल्थ इन्शुरन्ससाठी, वैद्यकीय इतिहास नसलेल्या लोकांसाठी (65 वर्षांपर्यंत) प्री-मेडिकल चाचण्यांची आवश्यकता नाही.
- शिवाय, 4 वर्षांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर पूर्व-अस्तित्वात असलेल्या रोगाला देखील कव्हर केले जाऊ शकते
एसबीआय हेल्थ इन्शुरन्स टोल-फ्री क्रमांक
एसबीआय जनरल इन्शुरन्स त्यांच्या अर्जदारांना आणि ग्राहकांना त्यांच्या टोल फ्री - 1800 22 1111 / 1800 102 1111 क्रमांकावर सोमवार ते शनिवार या कालावधीत, कॉल करण्याची सुविधा देते. ग्राहक त्यांना 1800 22 7244 / 1800 102 7244 वर फॅक्स देखील करू शकतात. तुम्ही त्यांना customer[.]care[at]sbigeneral.in वर ईमेल पाठवू शकता किंवा कोणत्याही एसबीआय जनरल इन्शुरन्स शाखेला भेट देऊ शकता.
एसबीआय हेल्थ इन्श्युरन्स - वारंवार विचारले जाणारे प्रश्न
-
उत्तर: एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडद्वारे प्रीमियम पेमेंटच्या काही पद्धती देऊ केल्या जातात, जसे की:
- शाखेत रोख पेमेंट
- ऑनलाइन पेमेंट
For the online payment mode, the policyholder can pay via:
- क्रेडीट कार्ड
- डेबिट कार्ड
- नेट बँकिंग
-
उत्तर: नोंदणीकृत एसबीआय हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन वापरकर्त्यांसाठी, तुमच्या पॉलिसी तपशीलांसह वेबसाइटवर लॉग इन करा आणि स्टेटस तपासा. एसबीआय हेल्थ इन्शुरन्स ऑनलाइन साइटवरील माहिती तुम्हाला तुमच्या पॉलिसीचे स्टेटस दर्शवेल.
-
उत्तर: तुम्हाला टोल फ्री नंबरवर कंपनीला कळवणे आवश्यक आहे किंवा तुम्ही कंपनीच्या मेल आयडीवर दावा विनंती पाठवू शकता. कागदपत्रांची यशस्वी पूर्तता केल्यावर, दावा 30 दिवसांच्या आत निकाली काढला जातो.
-
उत्तर: प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनी, पॉलिसीधारकांना फ्री-लूक कालावधी देऊ करते, जो साधारणतः 15 दिवसांचा असतो. या कालावधीत पॉलिसीला विनामूल्य रद्द केली जाऊ शकते. पॉलिसीच्या मुदतीच्या दरम्यान पॉलिसी रद्द करण्यासाठी कृपया विमा कंपनीकडे तपास करा.
-
उत्तर: प्रत्येक आरोग्य विमा पॉलिसीचा प्रीमियम हा, पॉलिसीचा प्रकार, विमाधारकाचे वय, विम्याची रक्कम इ.च्या आधारावर बदलतो. उदाहरणार्थ, 10 लाख रुपयांच्या पॉलिसीसाठी 36-40 वर्षे वयोगटातील कोणासाठीही प्रीमियम सुमारे 9,826 रुपये आहेत.
-
उत्तर: आरोग्य विमा पॉलिसीमधील कायमस्वरूपी वगळण्याच्या बाबी म्हणजे अशा परिस्थिती, ज्यामध्ये विमा कंपनी कोणत्याही परिस्थितीत दाव्याची रक्कम भरण्यास जबाबदार नसते. कायमस्वरूपी वगळण्याच्या बाबींमध्ये, प्रतीक्षा कालावधीचे कोणतेही कलम नसते, कारण त्यांना कव्हरेज लाभांमधून वगळलेले असते. त्यामध्ये आत्महत्येचे प्रयत्न, दारूचे अतिसेवन इत्यादी बाबींचा समावेश असू शकतो.
-
उत्तर: आधीच अस्तित्वात असलेले रोग म्हणजे, पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी पॉलिसी अर्जदाराला आधीच अस्तित्वात असलेले रोग होय. हे रक्तदाब, साखर, मधुमेह इत्यादी असू शकतात. या आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांना, खरेदी केलेल्या पॉलिसीवर अवलंबून, 2 ते 4 वर्षांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर कव्हर केले जाते.
एसबीआय हेल्थ इन्शुरन्स - बातमीपत्र
-
आता एसबीआय जनरल इन्शुरन्सचे सर्व आरोग्य विमा पॉलिसीधारक सुटकेचा नि:श्वास घेऊ शकतात कारण विमा कंपनीने सध्या सुरू असलेल्या कोविड-19 महामारीला कव्हर करणारी एक स्वतंत्र आरोग्य विमा पॉलिसी आणली आहे. आरोग्य संजीवनी हेल्थ इन्शुरन्स म्हणून ओळखले जाणाऱ्या या पॉलिसी कव्हरेज रु. 1 लाख ते 5 लाखांपर्यंत आहे, ज्यामध्ये कोविड-19 मुळे उद्भवलेल्या उपचार खर्चाला कव्हर केले जाते. यासारख्या उपक्रमामुळे, खर्चाची चिंता न करता, अशा वेळी त्रासमुक्त आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळण्यास मदत होऊ शकते.
पुशन महापात्रा, एसबीआय जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ यांनी या पॉलिसीच्या लॉन्चिंगच्या वेळी बोलताना आयआरडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परवडणाऱ्या प्रीमियम आणि मानक कव्हरेजसह लॉन्च केले जाणारे ही स्वागतार्ह घटना असल्याचे म्हटले. श्री. महापात्रा यांना खात्री होती की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे हेल्थ इन्श्युरन्सची संख्या वाढण्यास मदत होईल. आपल्या भाषणात त्यांनी असेही नमूद केले की, एसबीआय सारख्या विश्वासार्ह ब्रँडसह आणि मजबूत वितरण चॅनेलसह, ते या उत्पादनाची जाहिरात करण्याचा प्रयत्न करतील विशेषत: टियर 2, टियर 3 आणि ग्रामीण भागात, जेणेकरून जास्तीत जास्त जागरूकता सुनिश्चित केली जाऊ शकते.