न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा

(42 Reviews)
Insurer Highlights

*All savings are provided by the insurer as per the IRDAI approved insurance plan. Standard T&C Apply

*Tax benefit is subject to changes in tax laws. Standard T&C Apply

Back
Get insured from the comfort of your home
Get insured from the comfort of your home
  • 1
  • 2
  • 3
  • 4

Who would you like to insure?

  • Previous step
    Continue
    By clicking on “Continue”, you agree to our Privacy Policy and Terms of use
    Previous step
    Continue

      Popular Cities

      Previous step
      Continue
      Previous step
      Continue

      Do you have an existing illness or medical history?

      This helps us find plans that cover your condition and avoid claim rejection

      Get updates on WhatsApp

      Previous step

      When did you recover from Covid-19?

      Some plans are available only after a certain time

      Previous step
      Advantages of
      entering a valid number
      You save time, money and effort,
      Our experts will help you choose the right plan in less than 20 minutes & save you upto 80% on your premium

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी विमाधारकांना विविध प्रकारच्या आरोग्य विमा उत्पादनांमार्फत सर्वोत्तम लाभ देऊ करते. न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी जवळजवळ 1500 हून अधिक रुग्णालयांसोबत संलग्न आहे. जे आपातकाळात दर्जेदार आरोग्याची सेवा पुरवतात. सर्वच घटकांसाठी अनुकूल आरोग्य विमेचे पर्याय न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी आपल्या कस्टमर्सना देते. ज्यामध्ये कर्करोग सुरक्षा पॉलिसी, युवा भारत पॉलिसी, आशा किरण पॉलिसी, जागतिक आरोग्य विमा योजना, फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी, आदींसारख्या अनेक योजनांचा समावेश होतो. विविध प्रकारच्या हॉस्पिटल सेवांचे कव्हरेज ही विमा कंपनी त्यांच्या ग्राहकांना देते. न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी त्या-त्या योजनेंतर्गत अटी व नियमांची पुर्ती झाल्यावर हॉस्पिटल सेवांसाठी आर्थिक कव्हरेज देते. संबंधित आरोग्य विमाधारकाच्या शंका निरसनासाठी व त्यांच्या चौकशीला प्रतिसाद देण्यासाठी न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही व्यासपीठावर उपलब्ध आहे.

      Read More

      न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीविषयी माहिती :

      न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी ही एक विमा सुविधा देणारी कंपनी असून 1919 साली तिची स्थापना झाली. विमा उद्योग क्षेत्रातील शंभर वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असलेली ही कंपनी आहे. सध्या एकूण 27 देशांत कार्यरत असणारी ही कंपनी 1973 पासून भारत सरकारच्या अधिपत्यात विलीन झाली. न्यू इंडिया अॅशुरन्स तिच्या सर्वोत्तम सेवेसाठी ज्ञात आहे.

      गेल्या चाळीस वर्षांपासून अग्रगण्य विमा कंपनी म्हणून न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीची मार्केटमध्ये ओळख आहे. देशाच्या विविध भागात न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीचे जाळे विस्तारले आहेत. ही कंपनी संबंधित विमाधारकाच्या सेवेसाठी तत्पर असते. कस्टमरच्या गरजेनुसार सर्व प्रकारच्या ऑनलाइन व ऑफलाइन सुविधांची सोय ही विमा कंपनी करते.

      नवीन प्रवाहातील गोष्टींचा अभ्यास करून उत्तम गती व कार्यक्षमतेने न्यू इंडिया अॅशुरन्स वाटचाल करण्यास प्राधान्य देते. न्यू इंडिया अॅशुरन्स कॉ. लिमि. 2014 साली AAA / CRISIL याद्वारे प्रमाणित करण्यात आलेली एक सर्वोत्तम विमा कंपनी आहे. न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीचे यशाचे श्रेय त्यांच्या विमा योजनांच्या सर्वोत्तम श्रेणी, प्रभावी कार्यक्षमता, चौकशी तसेच तक्रार निवारणासाठीची संरचना, व्यवस्थापनातील कसब, इत्यादि गोष्टींना जाते. न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनी ही भारतात एकमेव थेट विमा कंपनी म्हणून प्रख्यात आहे.

      तुमच्या आवडीचे न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कव्हरेज निवडा

      ₹1लाखाचा
      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा
      ₹2लाखाचा
      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा
      ₹3लाखाचा
      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा
      ₹5लाखाचा
      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा
      ₹10लाखाचा
      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा
      ₹50लाखाचा
      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा एका दृष्टिक्षेपात :

      महत्त्वाची वैशिष्ट्ये ठळक मुद्दे
      नेटवर्क रुग्णालये 1500+
      खर्च केलेल्या दावा गुणोत्तर 103.19
      नूतणीकरणक्षमता आयुष्यभर
      प्रतिक्षा कालावधी --

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा योजने अंतर्गत कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात ?

      • इन - पेशंट हॉस्पिटलायझेशन खर्च :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा पॉलिसी विमाधारकाला इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनचा खर्च देऊ करते. यामध्ये पेशंटला हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवांचा समावेश होतो, जसे रूम भाडे, आपत्कालीन सेवा, नर्सिंग व बोर्डिंग सेवा, डॉक्टर फी, विविध प्रकारच्या आरोग्य चाचण्या, इत्यादी.

      • हॉस्पिटलायझेशन पूर्व तसेच हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य पॉलिसी हॉस्पिटलायझेशन पूर्व आणि हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च विमा योजनेमध्ये कव्हर करते. तसेच, रुग्णाला त्याच्या आजारनिदान करण्यासाठी सांगण्यात आलेल्या विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांचा तसेच डॉक्टरांच्या तपासणी व मताच्या फीचा समावेश आहे. हॉस्पिटलायझेशन पूर्व तीस दिवस आणि हॉस्पिटलायझेशन नंतर 60 दिवसांपर्यंतचा खर्च कव्हर कंपनी विमा पॉलिसीच्या माध्यमातून देते. दिवस कालावधीची मर्यादा विमा योजनेनुसार वेगवेगळी असू शकते.

      • दैनंदिन उपचार - सेवा प्रक्रियांचा खर्च :

      दैनंदिन उपचार-सेवांच्या यादीत एकूण 24 तासातील हॉस्पिटलमध्ये पेशंटला त्याच्या आजार किंवा दुखापतीवर इलाज म्हणून दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या मेडिकल सेवांचा समावेश आहे. ज्याचा खर्च न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा पॉलिसी देऊ करते.

      • रुग्णवाहिकेचा खर्च :

      पेशंटला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी सर्व सुविधांनीयुक्त आपत्कालीन रुग्णवाहिकेचा खर्च न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी करते.

      • अवयवदात्याचा खर्च :

      तसेच, पेशंटचे एखादे अवयव निकामी झाले असल्यास अवयव प्रत्यारोपण करण्याच्या निर्णयांत सगळ्या औपचारिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर अवयवदात्याने केलेल्या अवयवदानाचा खर्च न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी करते. यामध्ये स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन, बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन आदिंचा समावेश होतो.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा योजने अंतर्गत कोणत्या गोष्टी समाविष्ट होत नाहीत ?

      • जाणूनबुजून करून घेतलेली किंवा दुसऱ्याकडून झालेली इजा :

      पूर्वकल्पना देऊन किंवा मुद्दाम जाणून इजा करून घेतलेल्या केसचा कव्हरेज कंपनी देत नाही. न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी जर जाणूनबुजून किंवा पूर्वकल्पना देऊन एखाद्याने स्वत:ला इजा करून घेतली असेल किंवा इजा झाली असेल तर त्यासाठी लागणाऱ्या उपचाराचा खर्च कव्हरेज देत नाही. उदाहरणार्थ आत्मघाताचा प्रयत्न, आदि.

      • साहसी खेळांमध्ये झालेली दुखापत :

      कोणत्या तरी साहसी खेळामध्ये किंवा शर्यतीमध्ये सहभागी होऊन जर संबंधित व्यक्तीची आरोग्यहानी किंवा त्याला दुखापत झाली असेल तर अशा बाबतींतही न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी उपचाराचा कव्हर विमाधारकाला देत नाही.

      • आनुवंशिक विकार :

      तसेच, जर न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी पेशंट जर आनुवंशिक आजाराने ग्रस्त असेल तर त्या उपचाराचा खर्च देत नाही. याव्यतिरिक्त आनुवंशिक आजारासंबंधीच्या चाचण्यांना खर्च देखील विमाकर्ता देत नाही.

      • गुन्हेगारी कृत्यांत सहभाग :

      जर संबंधित व्यक्तीला त्याने वैयक्तिक पातळीवर केलेल्या किंवा एखाद्या गटासोबत केलेल्या गुन्ह्यामुळे जीवाला दुखापत झाली असेल तर त्याच्या उपचाराचा खर्च कंपनी देत नाही. कोणत्याही गुन्हेगारी प्रकारच्या कृत्यांत सहभागी झाल्यास संबंधित पेशंटच्या आरोग्य सेवेचा खर्च न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी नाकारते.

      • भारताबाहेरील उपचार :

      पेशंट जर भारताबाहेर इतर ठिकाणी उपचार घेत असेल किंवा उपचार घेतलेले असतील तर त्या उपचारांचा खर्च विमा योजनेमध्ये समाविष्ट नाही.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा योजना महत्त्वाची वैशिष्ट्ये:

      • 2014 AAA / CRISIL द्वारे प्रमाणित :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी ही 2014 साली AAA / CRISIL याद्वारे प्रमाणित करण्यात आलेली एक सर्वोत्तम कंपनी आहे.

      • उत्कृष्ट दावा सेटलमेन्ट गुणोत्तर :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीचा दावा सेटलमेन्ट गुणोत्तर सर्वोत्कृष्ट असून कंपनी दाव्यासंबंधीत सर्व सबबी काळजीपूर्वक हाताळते.

      • कंपनीचा 100 वर्षापेक्षा जास्त उद्योग अनुभव :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी ही जागतिक मार्केटमधील सर्वांत जास्त अनुभव असलेली अग्रगण्य कंपनी आहे. 1919 साली स्थापित झालेल्या या कंपनीला विमा क्षेत्राचा 100 वर्षाहून अधिक अनुभव आहे. नव्या प्रवाहातील गतीसह लीड विमा कंपनी म्हणून न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी प्रसिद्ध आहे.

      • रुग्णालयांचे विशाल जाळे :

      दर्जेदार आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयांशी संलग्न न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी आपल्या कस्टमरला उत्तम सेवा मिळावी यासाठी सदैव तत्पर असते. जवळजवळ 1500 पेक्षा जास्त हॉस्पिटल नेटवर्क न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी जोडून आहे.

      • ग्राहक समर्थन संघ :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीचा कार्यक्षम स्टाफ कस्टमरच्या शंकांचे निरसन करतो. ग्राहकांसाठी आपातकाळात ते मदतीचे हात होतात. विमाधारकांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या समस्यांना सोडवले जाते. ग्राहकांना न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीकडून ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही प्रकारे प्रतिसाद मिळतो.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा योजना :

      फायदे :

      • विम्याची विस्तृत मर्यादा :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा योजना तुमच्या सोयीनुसार विविध विम्याचे पर्याय उपलब्ध करून देते. सर्व बाबींशी तुलना करून तुमच्यासाठी किंवा तुमच्या परिवारातील व्यक्तींसाठी तुम्ही योग्य व सोयीची योजना खरेदी करू शकता. एक लाखापासून ते करोडपर्यंतच्या विमा योजना न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी तुम्हाला तुमच्या व तुमच्या परिवाराच्या आरोग्य हित संरक्षणासाठी सुचवते. तुम्हाला अनुकूल असलेली पॉलिसी निवडून, तिच्या सर्व नियम व अटी जाणून घेतल्यानंतर ती योजना तुम्ही खरेदी करून आरोग्य विम्याचा लाभ घेऊ शकता.

      • कंपनीकडून आजीवन नूतनीकरणाची सुविधा :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीच्या सर्व योजना आजीवन नूतनीकरणाची सुविधा देऊ करतात. तुम्ही तुमच्या योजनेचे औपचारिक गोष्टींची पूर्तता करून नूतनीकरण करू शकता. आणि, पॉलिसीचा लाभ चालू ठेवू शकता. आरोग्य पॉलिसी नूतनीकरण प्रक्रिया महत्त्वपूर्ण मानली जाते. कंपनीच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन विमा नूतणीकरणाची प्रक्रिया तुम्ही ऑनलाइन पद्धतीने करण्याची मुभा तुम्हाला कंपनी तर्फे दिली जाते.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा योजनांची सूची :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीने गेल्या कित्येक वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपून आहे. ही विमा कंपनी ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार किंवा त्यांच्या सोयीनुसार विविध आरोग्य विमा योजना ऑफर करते. कंपनीने वयोगट तसेच आरोग्य तक्रारी संबंधित अभ्यास करून सर्व योजना रेखल्या आहेत, ज्या तुम्हाला अधिक लाभ देतात. त्यामुळे कंपनीच्या आरोग्य विमा योजना सूचीमध्ये समाविष्ट असलेली योजना संबंधित ग्राहक वर्गासाठी अनुकूल सिद्ध होते.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीच्या काही योजनांची सूची पुढीलप्रमाणे आहे :

      • न्यू इंडिया टॉप अप मेडीक्लेम पॉलिसी :

        न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीच्या टॉप अप मेडीक्लेम पॉलिसीविषयीची काही वैशिष्ट्ये पुढे उल्लेखली आहेत,

        वैशिष्ट्ये :

        • संबंधित व्यक्तीचे वय योजना खरेदी करते वेळी 18 वर्षे ते 25 वर्षे या दरम्यान असावे
        • टॉप अप मेडीक्लेम पॉलिसी मध्ये पाच लाखांपासून ते बावीस लाख पर्यंतचे विमा रक्कमेचे पर्याय कंपनी देऊ करते
        • ही पॉलिसी हॉस्पिटल मध्ये भरती झाल्यानंतर इन पेशंट हॉस्पिटलायझेशनचा खर्च तुम्हाला ऑफर करते
        • ज्यामध्ये हॉस्पिटल मध्ये मिळत असलेल्या सर्व सेवांचा खर्च समाविष्ट असतो.
      • न्यू इंडिया फ्लोटर मेडीक्लेम पॉलिसी :

        फ्लोटर मेडीक्लेम योजना ही तुमच्या सोबत तुमच्या कुटुंबाला देखील संरक्षण कव्हर प्रदान करते. या पॉलिसीची वैशिष्ट्ये पुढे नमूद केल्याप्रमाणे,

        वैशिष्ट्ये :

        • वय वर्षे तीन महिने ते 65 वर्षे या गटातील लोक ही पॉलिसी खरेदी करू शकतात.
        • दोन लाख ते पंधरा लाख पर्यंतच्या विमा रक्कमेचे पर्याय ही पॉलिसी देते.
        • यामध्ये इन पेशंट हॉस्पिटलायझेशनचा खर्च तसेच हॉस्पिटलायझेशन आधीचा आणि नंतरचा ही खर्च समाविष्ट आहे.
        • याशिवाय ही पॉलिसी तुम्हाला हॉस्पिटल उपचाराशी निगडीत खर्च जसे रुग्णवाहिकेचा खर्च, आयुर्वेदिक उपचार खर्च आणि हॉस्पिटल मधील दैनंदिन प्रक्रियांचा खर्च, इत्यादी सर्व कव्हरेज देते.
        • याव्यतिरिक्त ही विमा पॉलिसी इतर तीन पर्यायांसाठी कव्हरेज देते ज्यामध्ये बाळंतपणा नंतरचा खर्च कव्हरेज सुद्धा समाविष्ट आहे.
      • न्यू इंडिया आशा किरण आरोग्य पॉलिसी :

        न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीच्या विविध योजनांपैकी आशा किरण आरोग्य विमा योजना एक आहे. केवळ मुलीचे पालकच ही पॉलिसी खरेदी करू शकतात व लाभ मिळवू शकतात. परिवारातील पालकांसह दोन मुलींना ही पॉलिसी कव्हरेज प्रदान करते. या योजनेची काही वैशिष्ट्ये पुढे उल्लेख केल्याप्रमाणे,

        वैशिष्ट्ये :

        • न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीची आशा किरण ही पॉलिसी 18 वर्षे ते 65 वर्षे या वयातील व्यक्ति खरेदी करू शकतात.
        • पालकांचे वय जर 50 वर्षांपेक्षा अधिक असेल तर पॉलिसी खरेदी करताना त्यांची आरोग्य चाचणी केली जाते.
        • पॉलिसी खरेदी करणाऱ्या पालकांच्या मुलीचे वय तीन महिने ते पंचवीस वर्षे इतके असावे.
        • अपघाती निधन झाल्यास ही पॉलिसी कव्हरेज देऊ करते.
        • नवजात कन्या बालिकेला सुद्धा ही पॉलिसी कव्हरेज देते.
        • कायमस्वरूपी अपंगत्व आले असल्यास ही पॉलिसी संबंधित व्यक्तीला कव्हरेज देते.
        • तसेच, शरीराचा अंग गमावला असल्यास कव्हरेज मिळते. उदरणार्थ, एक डोळा किंवा दोन्ही डोळे, इत्यादी.
      • न्यू इंडिया युवा भारत आरोग्य पॉलिसी :

        न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीच्या युवा भारत आरोग्य विमा पॉलिसीचा लाभ विशिष्ट वयोगटातील व्यक्तिच घेण्यासाठी पात्र आहेत. या आरोग्य विम्याची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे,

        वैशिष्ट्ये :

        • न्यू इंडिया युवा भारत ही पॉलिसी तुम्हाला बेस, गोल्ड आणि प्लॅटिनम असे तीन पर्याय देते.
        • ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या किंवा त्यासंबंधीत अहवाल द्यावा लागत नाही.
        • या आरोग्य विमा पॉलिसी साठीची वय प्रवेश मर्यादा ही 18 वर्षे ते 45 वर्षे इतके आहे.
        • ही पॉलिसी संबंधित विमाधारकाला आजीवन पॉलिसी नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करून देते.
        • न्यू इंडिया युवा भारत आरोग्य विमा पॉलिसी साठ दिवस पूर्व हॉस्पिटलायझेशन आणि नव्वद दिवसांपर्यंतचा हॉस्पिटलायझेशन नंतरचे कव्हरेज योजनेच्या अंतर्गत काही अटी पुर्ततेनंतर देते.
        • या विम्याचे हप्ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहमाही किंवा वार्षिक इत्यादी पर्यायांचा अवलंब करून भरू शकता.
      • न्यू इंडिया मेडीक्लेम पॉलिसी :

        न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीच्या मेडीक्लेम पॉलिसीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत,

        वैशिष्ट्ये :

        • न्यू इंडिया मेडीक्लेम पॉलिसीची वयोमर्यादा 18 वर्षे ते 65 वर्षे इतके आहे.
        • ही पॉलिसी कुटुंबातील 3 महिने ते 25 वर्षे या वयोगटातील मुलांना ही कव्हरेज देते जे आर्थिक दृष्ट्या विमाधारकावर अवलंबून असतात.
        • या पॉलिसी अंतर्गत दोन लाख ते पंधरा लाखापर्यंत विमा लाभ विमाधारकाला मिळू शकतो.
        • गरज पडल्यास अवयवदात्याचा खर्च, आयुर्वेदिक उपचार खर्च कव्हरेज ही पॉलिसी विमाधारकाला देते.
      • न्यू इंडिया जनता मेडीक्लेम पॉलिसी :

        न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी संबंधित गटाच्या सोयीसाठी विमाधारकाला जनता मेडीक्लेम पॉलिसी ऑफर करते, तिची वैशिष्ट्ये पूढे नमूद केल्याप्रमाणे आहेत,

        वैशिष्ट्ये :

        • न्यू इंडिया जनता मेडीक्लेम पॉलिसी ही वय 18 वर्षे ते 60 वर्षे या गटातील व्यक्तींसाठी आहे. या गटातील इच्छुक जनता पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात.
        • तसेच, वय तीन महिने पासून ते अठरा वर्षे पर्यन्तच्या मुलांना ही कव्हरेज देते.
        • ही विमा पॉलिसी हॉस्पिटल मधील दैनंदिन उपचार प्रक्रियांचा खर्च कव्हर करते.
        • त्याच प्रमाणे पेशंटला पोहोचवण्यासाठी झालेला रुग्णवाहिका खर्च व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा ही खर्च कव्हर करते.
        • तीस दिवसांपर्यंत पूर्व हॉस्पिटलायझेशन आणि हॉस्पिटलायझेशन नंतरच्या साठ दिवसांचा खर्च ही न्यू इंडिया जनता आरोग्य विमा पॉलिसी कव्हर करते.
      • न्यू इंडिया कोरोना कवच विमा योजना :

        न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी ग्राहकांना कोरोना कवच आरोग्य विमा पॉलिसी प्रदान करते, जिची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत,

        वैशिष्ट्ये :

        • कोरोना पोझिटिव्ह पेशंटसाठी ही पॉलिसी उपचार लाभ देते.
        • दरम्यानचा सर्व हॉस्पिटल खर्च कव्हर करते.
        • या योजनेच्या प्रवेशासाठी 18 वर्षे ते 65 वर्षे इतकी वयोमर्यादा ग्राह्य धरली जाते.
        • तसेच, एक दिवसाच्या बाळापासून ते 18 वर्षे पर्यन्तच्या आर्थिदृष्ट्या अवलंबून असलेल्या मुलांना ही विमा योजना आरोग्य कव्हरेज देते.
        • हॉस्पिटलचे रूम भाडे, नर्सिंग सुविधा, बोर्डिंग सेवा, आईसीयू सुविधा तसेच डॉक्टर काउन्सेलिंग, विविध प्रकारच्या आरोग्य चाचण्या, रुग्णवाहिकेचा खर्च या सर्व सेवा ही कोरोना कवच पॉलिसी कव्हर करते.
        • विमाधारक ही पॉलिसी खरेदी करून आपत्कालीन संबंधित उपचाराकरिता पाच लाखापर्यन्त विमालाभ मिळवू शकतो.
      • न्यू इंडिया कॅन्सर सुरक्षा विमा योजना :

        न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी कॅन्सर सारख्या आजारासाठी सुरक्षा विमा योजना ऑफर करते. जी फक्त कॅन्सरशी संबंधित उपचारावर लागू पडते. या योजनेचे वैशिष्ट्य पुढे नमूद केल्याप्रमाणे आहेत,

        वैशिष्ट्ये :

        • न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीची कॅन्सर सुरक्षा विमा योजनेचा लाभ तीन महिने ते 65 वर्ष दरम्यान वयोगटातील व्यक्ति घेऊ शकतात.
        • उपचाराअंतर्गत किमोथेरपी, रेडिओथेरपी तसेच कॅन्सरच्या उपचाराचा भाग म्हणून झालेले अवयव प्रत्यारोपण आदि सर्व गोष्टींचा कव्हरेज ही कॅन्सर सुरक्षा पॉलिसी विमाधारकाला देऊ करते. अवयव प्रत्यारोपण मध्ये स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन, बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन, इत्यादी उपचार समाविष्ट आहेत.
        • या पॉलिसीचे सर्व कव्हरेज फक्त कॅन्सर संबंधित उपचारासाठीच मर्यादित आहेत.
        • तीस दिवसांचा हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा खर्च आणि साठ दिवसांचा हॉस्पिटलायझेशन नंतरचा खर्च पॉलिसी कव्हर करते.
        • डिस्चार्ज मिळाल्यानंतर कॅन्सरच्या डॉक्टर सल्ल्यानुसार ‘फॉलो अप’ उपचारासाठी सुद्धा न्यू इंडिया कॅन्सर सुरक्षा पॉलिसी कवरेज देते.
      • न्यू इंडिया आरोग्य संजीवनी योजना :

        न्यू इंडिया आरोग्य संजीवनी योजना ही न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीची एक उत्तम सुविधा देणारी विमा पॉलिसी असून तिची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत,

        वैशिष्ट्ये :

        • ही पॉलिसी खरेदी करण्यासाठीची वय मर्यादा 18 वर्षे 65 वर्षे इतके आहे. या गटातील कोणतीही इच्छुक व्यक्ति आरोग्य संजीवनी पॉलिसीचा लाभ मिळवू शकते.
        • त्याचबरोबर तीन महिने ते 25 वर्षे वयोगटातील आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून असणाऱ्या मुलांचाही समावेश या योजनेमध्ये करता येतो.
        • ही विमा पॉलिसी ‘आयुष’ उपचारास कव्हरेज देते.
        • दंतोपचारास तसेच रोबोट शल्य चिकित्सेला, किमोथेरपिसाठी विशिष्ट प्रमाणात कवरेज देऊ करते.
      • न्यू इंडिया सिनियर सिटीझन मेडीक्लेम पॉलिसी :

        न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी खास सीनियर सिटीझन गटाला ही आरोग्य विमा पॉलिसी ऑफर करते. संबंधित व्यक्ति या विम्याचा लाभ घेऊ शकतात. सीनियर सिटीझनना मेडीक्लेम पॉलिसी खरेदी करणे त्यांच्यासाठी सोयीचे सिद्ध होते. या पॉलिसीची काही वैशिष्ट्ये खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत. तसेच, इच्छुक व्यक्ति सीनियर सिटीझन मेडीक्लेम पॉलिसीच्या अटी व नियमांची माहिती घेऊन आपत्कालीन आरोग्य सुरक्षेसाठी ही पॉलिसी खरेदी करू शकतात. न्यू इंडिया सीनियर सिटीझन मेडीक्लेम पॉलिसीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे,

        वैशिष्ट्ये :

        • या पॉलिसी साठीची वयोमर्यादा ही 61 वर्षे ते 69 वर्षे या दरम्यान आहे.
        • दोन वर्षांच्या प्रतीक्षा कालावधी नंतर कंपनी तुम्हाला पूर्व अस्तित्त्वातील व्याधी साठीचे कव्हरेज ऑफर करते.
        • पॉलिसी धारकाचे प्रवेश वय जास्त असल्याने सीनियर सिटीझन करीता प्रीमियम पे सुद्धा जास्त असतो.
        • न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी नव्वद वर्षांपर्यंत नूतनीकरण सुविधेची सोय ग्राहकांना देते.
        • तीस दिवसांचा हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा आणि साठ दिवसांचा नंतरचा खर्च ही पॉलिसी सीनियर सिटीझनला देऊ करते.
        • पॉलिसी खरेदी करताना पूर्व अस्तित्वातील व्याधी जाणून घेण्यासाठी मेडिकल स्क्रीनिंग अवश्य केले जाते.

      पॉलिसीबाजार वरून न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कशी खरेदी करावी ?

      तुम्ही न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आरोग्य विमा खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त, जवळच्या शाखेत भेट देऊन किंवा संबंधित एजंटशी संपर्क साधूनही विमा खरेदी करू शकता. जर तुम्हाला पॉलिसीबाजारच्या माध्यमातून तुमचा आरोग्य विमा खरेदी करायचा असेल तर खालील काही पायऱ्यांचा अवलंब करून तुम्ही न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा सहज व सोप्या पद्धतीने खरेदी करू शकता.

      पायरी एक :

      www.policybazaar.com या पॉलिसीबाजारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

      पायरी दोन :

      त्यानंतर तेथील आरोग्य विमा पेजवर जा.

      पायरी तीन :

      पुढे तुम्ही इन्शुरन्स गणक पेजवर जाऊन तुम्ही तुमच्या सोयीची व तुम्हास योग्य ती विमा योजना खरेदी करू शकता.

      पायरी चार :

      तुमच्या मूलभूत माहितीची नोंद करा जसे नाव, संपर्क क्रमांक, वय, योजनेचा प्रकार, इत्यादी.

      पायरी पाच :

      पुढील पेजवर तुम्हाला संबंधित काही आरोग्य विमा योजना सुचविल्या जातील.

      पायरी सहा :

      सर्व योजनांची तुलना करून तुम्ही तुमची गरज व सोय यांच्याशी जुळून येणारी फायदेशीर अशी योजना तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या परिवारासाठी निवडू शकता.

      पायरी सात :

      शेवटच्या पायरीत तुम्ही प्रीमियम भरून तुम्ही न्यू इंडिया अॅशुरन्स विमा कंपनीची आरोग्य संरक्षण पॉलिसी खरेदी करून अपेक्षित तो लाभ मिळवू शकता.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा योजनेचे नूतनीकरण कसे करावे ?

      आरोग्य विमा योजनेचे नूतनीकरण अतिशय महत्वाचे असते. जर त्या-त्या वेळी तुम्ही आरोग्य विमा योजनेच्या नूतनीकरणाकडे दुर्लक्ष केले तर अनेक लाभांपासून तुम्ही वंचित राहू शकता. तर, हे टाळण्यासाठी पॉलिसी नूतनीकरण करून घेणे आवश्यक ठरते. विमा नूतनीकरण केल्याने काही फायद्यांचा लाभ घेण्यास तुम्ही पात्र बनता जसे प्रतीक्षा कालावधी बोनस, नो क्लेम बोनस, इत्यादी. न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी तुम्हांला तुमच्या विमा योजनेच्या नूतनीकरणसाठी ऑनलाइन पद्धतीचा एक पर्याय देते. जिथे तुम्ही खालील गोष्टींच्या आधारे तुमची आरोग्य विमा योजना नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करू शकता. आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर वेळोवेळी त्याच्या नूतनीकरणाची प्रक्रियासुद्धा विशेष महत्त्वाची ठरते.

      पायरी एक :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या. तिथे जाऊन क्विक हेल्प नावाच्या टॅबवर क्लिक करा. आणि, नंतर क्विक रिन्यूवल वर क्लिक करा. म्हणजे, तुमच्या नूतणीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

      पायरी दोन :

      यानंतर तिथे तुम्हांला काही आवश्यक वैयक्तिक बाबी विचारल्या जातात. प्रकिया पुढे नेण्यासाठी, तुम्ही तुमची कस्टमर आइडी आणि विमा क्रमांक नमूद करा.

      पायरी तीन :

      पुढे स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या कोट्सपैकी समर्पक कोट निवडा.

      पायरी चार :

      ऑनलाइन पद्धतीने, नूतणीकरणस आवश्यक असलेल्या प्रीमियमचे सुरक्षित पेमेंट करा.

      पायरी पाच :

      यानंतर तुम्हांला प्राप्त झालेली पावती तुमच्या जवळ प्रिंट करून ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा योजनेचा दावा कसा दाखल करायचा ?

      कॅशलेस दावा सुविधा :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा योजनेंतर्गत कॅशलेस दावा दाखल करण्यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टींचा पाठपुरावा करा,

      • न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये भरती होणे

      कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर लगेच किंवा हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा डॉक्टरांचा सल्ला असेल तर हॉस्पिटल मध्ये भरती होण्यापूर्वी किंवा हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर पहिल्या 48 तासांच्या आत टिपीएला यासंबंधी कळविणे अत्यंत आवश्यक असते. अचानक आपत्कालीन हॉस्पिटल भरती व्हायचे असेल तर अशा कठीण प्रसंगी 24 तासांच्या आत टिपीएला कळविणे भाग असते. पूर्व अधिकृतीकरण करण्यासाठी तुम्ही विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुमच्या हॉस्पिटल भरती विषयी कळवू शकता.

      • कॅशलेस दाव्यासंबंधी एक फॉर्म दाखल करणे

      नंतरच्या प्रक्रियेत कॅशलेस दावा करावयाचा एक फॉर्म हॉस्पिटलमध्ये योग्य माहितीसह भरून झाल्यानंतर टिपीएला दाखल करा. विमा योजनेमध्ये नमूद गोष्टींचा लाभ मिळवण्याकरिता ही पायरी महत्त्वाची मानली जाते.

      • हॉस्पिटलच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेणे

      कॅशलेस दावा करण्यासाठीचा फॉर्म भरून टिपीएकडे दाखल झाल्यानंतर तिथे त्या फॉर्ममध्ये नमूद झालेल्या सर्व माहितीची पडताळणी होते. ही पडताळणी करताना टिपीए तुमच्या पॉलिसीतील नियम व अटी यांच्या सोबत तुम्ही दाखल केलेल्या दाव्याची तुलना करतात. आणि, सर्व बाबी तपासतात.

      • दाव्याचे सेटलमेन्ट : जर सर्व गोष्टींची अचूक पूर्तता झाली तर तुम्ही केलेल्या कॅशलेस दाव्याला मान्यता मिळते. यानंतर विमादाता त्या नेटवर्क हॉस्पिटलला तुमची अधिकृतता कळविते. तुमच्या कॅशलेस दाव्यास तुम्ही पात्र सिद्ध झाल्याने विमादाता पेमेंट करतो.

      कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आढळल्यास किंवा अपूर्ण माहिती नमूद झाल्यास तुमचा कॅशलेस हा दावा मंजूर होत नाही. मग तुम्ही हॉस्पिटलचे बिल भरण्यास व प्रतिपूर्तीचा दावा करण्यास जबबाबदर असता. पॉलिसी कंपनीला दाखल केली जाणारी सर्व वैद्यकीय कागदपत्रे अधिकृत असावीत. न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनी तिच्या अटी आणि नियमांचे पालन करून त्यांच्या ग्राहकाला सुविधा प्राप्त करून देते.

      प्रतिपूर्ति दावा प्रक्रिया सुविधा :

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा योजनेंतर्गत प्रतिपूर्ति दावा दाखल करण्यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टींचा पाठपुरावा करा,

      • नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये भरती होणे

      तुमच्या सोई नुसार कोणत्याही नॉन नेटवर्क होस्पिटलमध्ये भरती व्हा. हॉस्पिटल भरती नंतर पुढच्या 24 तासांच्या आत यासंबंधीची माहिती टिपीएला कळवा. ही पायरी आवश्यक मानली जाते. पूर्व अधिकृतीकरण करण्यासाठी तुम्ही विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुमच्या हॉस्पिटल भरती विषयी कळवू शकता.

      • भरती झालेल्या हॉस्पिटलमधून आवश्यक ती ट्रीटमेंट घेणे आणि बिल सेटल करणे

      त्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले सर्व प्रकारचे आवश्यक उपचार करून घेणे. आणि, संपूर्ण उपचार दरम्यान आलेला सर्व सेवा प्रक्रियांसाठीचा झालेला खर्च भरणे.

      • हॉस्पिटलमधील उपचार दरम्यानचे सर्व कागदपत्रे, पावत्या आणि रिपोर्टस गोळा करणे

      यानंतर हॉस्पिटल मधील सर्व प्रकारचे कागदपत्रे पुढच्या प्रक्रियेसाठी गोळा करा. प्रत्येक कागदपत्राला विशेष महत्व असते. या सूचीमध्ये पुढील सर्व कागदपत्रांचा समावेश होतो. उदाहरणार्थ हॉस्पिटलचे बिल, मेडिकल मधील औषध बिल, पॅथोलॉजी बिल, एक्स रे बिल, डॉक्टर समुपदेशन फी बिल, इतर सर्व मेडिकल उपचार साहित्य बिल, इत्यादी. अचूक माहितीची सर्व कागदपत्रे तुम्हाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळल्यानंतर पुढच्या सात दिवसांच्या आत दाखल करावे लागते. नंतर तुमचा दावा दाखल होतो.

      दावा सेटलमेन्टसाठी सबमिट करावयाची कागदपत्रे :

      तुम्हांला प्रतिपूर्तीचा दावा सेटलमेन्ट करताना खालील सर्व कागदपत्रांची पुष्टी करावी लागेल,

      • तुमच्या आवश्यक माहिती व स्वाक्षरीसह संबंधित दावा केल्याचा फॉर्म
      • हॉस्पिटल डिस्चार्ज रिपोर्टची मूळ प्रत
      • इतर सर्व वैद्यकीय चाचणी केलेल्या बिलांची मूळ प्रत
      • हॉस्पिटल ट्रीटमेंट बिल मूळ प्रत
      • हॉस्पिटल ट्रीटमेंट संबंधी सर्वच सेवा खर्चाचा मूळ अहवाल
      • कंपनीला कोणतेही अधिक कागदपत्र हवे असल्यास त्यासंबंधी मागणी ते करू शकतात.

      दाव्याचे सेटलमेन्ट : जर सर्व गोष्टींची अचूक पूर्तता झाली तर तुम्ही केलेल्या कॅशलेस दाव्याला मान्यता मिळते. यानंतर विमादाते त्या नेटवर्क हॉस्पिटलला तुमची अधिकृतता कळवितात. तुमच्या कॅशलेस दाव्यास तुम्ही पात्र सिद्ध झाल्याने विमादाते पेमेंट करतात.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा प्रीमियम गणना :

      खालील मुद्दे लक्षात घेऊन आरोग्य विमा प्रीमियमची गणना होते,

      • वय :

      आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर वयाचा प्रभाव पडतो. जसे तरुण लोक वृद्ध लोकांच्या तुलनेत कमी आजारी पडतात. हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी ते दाखल होण्याचे त्यांचे प्रमाण वृद्धांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे, तुमचे वय कमी असताना तुम्हाला प्रीमियम कमी भरवा लागतो, आणि जास्त वय असणाऱ्या लोकांना अधिक प्रीमियम भरावे लागते.

      • वैद्यकीय तपशिल :

      आरोग्य विमा पॉलिसीसाठी तुमचा व तुमच्या परिवाराचा सर्व प्रकारचा वैद्यकीय इतिहास विचारात घेतला जातो. सर्वांच्या आरोग्य विषयक बाबी नमूद होतात. तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील व्यक्ति कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, युटीआय, आदि. यांसारख्या आजारांनी ग्रस्त असताल तर तिथे तुम्हाला जास्त प्रीमियम लागू होतात.

      • जीवनशैलीच्या सवयी :

      आरोग्य विमा पॉलिसी उतरवताना जीवनशैलीच्या सवयी जसे विशेष करून व्यसनाच्या काही सवयी ज्यांत सिगारेट ओढणे, दारू पिणे, तंबाखू खाणे, किंवा इतर आमली पदार्थांचे सेवन आरोग्याच्या तक्रारी वाढवतात, ज्यामुळे तुमचे आरोग्य चक्र बिघडते. म्हणून तुम्हाला अधिक प्रीमियम भरावे लागते, तसेच यामुळे उद्भवलेले आजार विमादाता कव्हर देखील करत नाही.

      • पूर्व-अस्तित्वातील आजार :

      पूर्व-अस्तित्वातील आजार आणि त्याविषयीची सर्व माहिती पॉलिसीत नमूद होते. जर विमा खरेदी करण्यापूर्वी किंवा आरोग्य विमा खरेदी करताना तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर तुमचे प्रीमियमही त्यानुसार जास्त असते.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विम्याचे नेटवर्क हॉस्पिटल :

      आरोग्य विमा कंपन्यांशी संबंधित हॉस्पिटल्स नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणून ओळखली जातात. न्यू इंडिया अॅशूरन्स आरोग्य विमा कंपनीचे नेटवर्क हॉस्पिटल पेमेंट करताना कॅशलेस व्यवहाराची सुविधा देतात. शिवाय ते योग्य वैद्यकीय सेवा आणि उपचार, कार्यक्षमता, विश्वासार्हता, कौशल्य, इत्यादी बाबींच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांची निवड करतात. दर्जेदार आरोग्य सेवांना न्यू इंडिया अॅशूरन्स आरोग्य विमा कंपनी नेहमी प्राधान्य देते. पॉलिसीपरत्वे आरोग्य सेवांचे कव्हर देते.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीचे भारतभर रुग्णालयांसोबत विस्तृत नेटवर्क आहे. देशाच्या विविध भागात कंपनीच्या शाखा कार्यरत आहेत. जवळजवळ 1500 हूनही अधिक रुग्णालये न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीशी संलग्न आहेत. तिथे देण्यात येणाऱ्या सेवांच्या निकषांवरून कंपनी वेळोवेळी रुग्णालयांच्या यादीचे नूतनीकरण करत असते. नेटवर्क हॉस्पिटल्सचे विविध फायदे आहेत. ही सुविधा अडचणीच्या वेळी तुम्हाला तणावमुक्त करते. तुम्ही उत्तम आरोग्य सेवेस पात्र होता.

      न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीशी संपर्क कसा साधावा ?

      तुम्हाला संपर्क साधण्यासाठी पुढील सर्व पर्याय उपलब्ध आहेत जसे न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीच्या 1800 209 1415 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून किंवा tech.support@newindia.co.in वर ईमेल करून संपर्क साधू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जवळच्या कंपनी शाखेला किंवा संबंधित एजंटला भेटून तुम्ही न्यू इंडिया अॅशुरन्स आरोग्य विमा कंपनीशी संपर्क साधू शकता.

      वारंवार विचारले जाणारे प्रश्न

      Policybazaar exclusive benefits
      • 30 minutes claim support*(In 120+ cities)
      • Relationship manager For every customer
      • 24*7 claims assistance In 30 mins. guaranteed*
      • Instant policy issuance No medical tests*
      book-home-visit
      Disclaimer: Policybazaar does not endorse, rate or recommend any particular insurer or insurance product offered by an insurer.
      top
      Close
      Download the Policybazaar app
      to manage all your insurance needs.
      INSTALL