एलआयसी जीवन आरोग्य प्लॅन

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन किंवा एलआयसी इंडियाद्वारे एलआयस जीवन आरोग्य प्लॅन देऊ केला जातो, जी एक अद्वितीय नॉन-पार्टिसिपेटेड नॉन-लिंक्ड आरोग्य विमा योजना आहे. या पॉलिसीद्वारे भारतीय ग्राहकांच्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण केल्या जातात आणि पॉलिसीधारकाला एकरकमी आधारावर विम्याची रक्कम देऊ केली जाते.

Read More

एलआयसी जीवन आरोग्य प्लॅन

आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा!
I am a

My name is

My number is

By clicking on ‘View Plans’ you, agreed to our Privacy Policy and Terms of use
Close
Back
I am a

My name is

My number is

Select Age

City Living in

    Popular Cities

    Do you have an existing illness or medical history?

    This helps us find plans that cover your condition and avoid claim rejection

    Get updates on WhatsApp

    What is your existing illness?

    Select all that apply

    When did you recover from Covid-19?

    Some plans are available only after a certain time

    एलआयसी जीवन आरोग हेल्थ इन्शुरन्स प्लॅन

    एलआयसी जीवन आरोग्य हेल्थ प्लॅन तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मुले, पती / पत्नी आणि आईवडिलांसह विशिष्ट आजारांविरुद्ध आरोग्य विमा कव्हर देऊ करते आणि वैद्यकीय गरजांच्या बाबतीत वेळेवर आर्थिक सहाय्य पुरवते. एलआयसी जीवन आरोग्य प्लॅन, खालील पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहे:

    तुमच्या आवडीचे आरोग्य विमा कव्हरेज निवडा

    पात्रता निकष

    निकष तपशील
    प्रवेशाचे वय स्वतः / जोडीदार 18-65 वर्ष आईवडील / सासू-सासरा 18-75 वर्ष मुले: 91 दिवस - 17 वर्ष
    प्रतीक्षा कालावधी 90 दिवस
    विम्याची रक्कम एकरकमी आधारावर देऊ केली जाते
    अॅम्ब्युलन्स कव्हर र. 1,000
    सर्जिकल बेनिफिट कव्हर रु. 1 लाख ते 4 रु. लाख

    आरोग्य विमा कंपनी
    Expand

    एलआयसी जीवन आरोग्य प्लॅनची प्रमुख वैशिष्ट्ये

    एलआयसी जीवन आरोग्य पॉलिसीची काही प्रमुख वैशिष्ट्ये खाली दिली आहेत:

    • या पॉलिसीद्वारे इन्डिव्हिज्युअल आणि फॅमिली फ्लोटर आधारावर कव्हरेज देऊ केले जाते
    • प्रीमियम, वार्षिक आणि अर्धवार्षिक पद्धतीने भरला जाऊ शकतो
    • प्रीमियमच्या सूटचा लाभ देखील देऊ केला जातो
    • या एलआयसी आरोग्य विमा पॉलिसीद्वारे डे केअर प्रक्रिया देखील कव्हर केल्या जातात
    • अॅम्ब्युलन्सचे कव्हर देखील देऊ केले जाते
    • या एलआयसी आरोग्य विमा योजनेंतर्गत सर्व मोठ्या शस्त्रक्रियांना कव्हर केले जाते

    एलआयसी जीवन आरोग्य प्लॅनमध्ये समाविष्ट बाबी

    एलआयसी जीवन आरोग्य पॉलिसीद्वारे हॉस्पिटलायझेशन किंवा शस्त्रक्रिया यासारख्या वैद्यकीय आणीबाणीच्या बाबतीत मौल्यवान आर्थिक कव्हरेज देऊ केले जाते. ही पॉलिसी दरवर्षी वाढत्या आरोग्य कव्हरसह उबलब्ध आहे आणि तिच्याद्वारे वास्तविक वैद्यकीय खर्चाचा विचार न करता एकरकमी लाभ देऊ केला जातो. ही पॉलिसी खाली दिलेल्या कव्हरेज लाभांच्या श्रेणीसह उपलब्ध आहे:

    1. हॉस्पिटल कॅश बेनिफिट (एचसीबी)

    विमाधारक व्यक्तीला किंवा प्लॅनमध्ये कव्हर करण्यात आलेल्या त्याच्या / तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावरील आजारपणामुळे किंवा अपघाती दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करावे लागल्यास, ते हॉस्पिटलायझेशन कॅश बेनिफिटसाठी पात्र असतील. मूळ योजनेअंतर्गत या लाभाचे वितरण रु. 1000 च्या पटीत असेल आणि ते खालील प्रमाणे आहे:

    • आयसीयू व्यतिरिक्त इतर वार्डसाठी किमान प्रारंभिक दैनिक हॉस्पिटल रोख लाभ: रु. 1000 विमाधारक / पती / पत्नी / मुले / आईवडील किंवा सासू सासरा यांच्यासाठी. (जेव्हा विम्याची मूळ रक्कम रु. 1000 आहे)
    • आयसीयूच्या व्यतिरिक्त इतर वॉर्डसाठी कमाल प्रारंभिक दैनिक रोख लाभ: विमाधारक / पती / पत्नी / मुले / आईवडील किंवा सासू सासरा यांच्यासाठी मुख्य विमाधारकापेक्षा कमी किंवा समान. (जेव्हा विम्याची मूळ रक्कम रु. 4000 आहे)
    • रुग्णालयात दाखल केल्याच्या पहिल्या दिवसासाठी कोणताही लाभ दिला जात नाही.
    • पहिल्या पॉलिसी वर्षात जास्तीत जास्त 30 दिवस आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये 90 दिवसांसाठी हॉस्पिटल कॅश बेनिफिटचा दावा केला जाऊ शकतो. यामध्ये आयसीयूतील दिवसांचा समावेश आहे.
    • पहिल्या वर्षात जास्तीत जास्त आयसीयू हॉस्पिटलायझेशन दिवस 15 दिवस आणि त्यानंतर 45 दिवसांपर्यंत असतात.
    • कमाल आयुष्यभरासाठी लाभ कालावधी 720 दिवसांपर्यंत मर्यादित आहे, आयसीयूसह, 360 दिवसांपेक्षा जास्त नाही.

    2. मेजर सर्जिकल बेनिफिट (एमएसबी)

    • पॉलिसीच्या कालावधीत विमाधारक व्यक्तीला शस्त्रक्रिया करणे भाग पडल्यास, त्याला / तिला हा लाभ दिला जातो
    • तो नेहमीच तुमच्या हॉस्पिटल कॅश बेनिफिटच्या किंवा लागू होणाऱ्या डेली बेनिफिट (एडीबी)च्या 100 पट असतो.
    • तो 1 लाख ते 4 लाख रुपयांपर्यंत असतो
    • प्रत्येक विमाधारकाला वर्षभरात लागू होणारे जास्तीत जास्त सर्जिकल लाभ हे, प्रमुख सर्जिकल बेनिफिट सम अॅश्युअर्डच्या 100% असतात.
    • प्रत्येक विमाधारकाला आयुष्यभरात लागू होणारा कमाल लाभ हा, एमएसबी सम अॅश्युअर्डच्या 800% असतो.

    3. डे केअर प्रक्रियेचा लाभ

    • भारतातील विमाधारकाने केलेल्या कोणत्याही डे केअर प्रक्रियेसाठी विमाधारकाला देय असलेला हा एकरकमी लाभ आहे, ज्यासाठी सतत हॉस्पिटलायझेशन आवश्यक नसते.
    • ते एडीबी किंवा लागू दैनिक लाभाच्या 5 पट असतो
    • या योजनेंतर्गत प्रत्येक विमाधारक व्यक्ती, एका वर्षात तीन पर्यंत शस्त्रक्रिया प्रक्रियेसाठी दरवर्षी हा लाभ प्राप्त करण्यास पात्र आहे.
    • कमाल आयुष्यभराचा लाभ, प्रत्येक विमाधारकाला लागू
    • या योजनेअंतर्गत प्रत्येक विमाधारक व्यक्ती, 24 पर्यंत शस्त्रक्रिया प्रक्रियेसाठी पॉलिसीच्या जीवनकाळात हा लाभ मिळवण्यास पात्र आहे.

    4. इतर सर्जिकल बेनिफिट फायदे

    • जर विमा उतरवलेल्या व्यक्तीला अशी कोणतीही शस्त्रक्रिया करणे भाग पडले, जी एमएसबी किंवा प्रमुख सर्जिकल बेनिफिट अंतर्गत समाविष्ट नाही, तर शस्त्रक्रियेचा खर्चास या ओएसबी किंवा इतर सर्जिकल बेनिफिट अंतर्गत कव्हर केले जाईल.
    • दैनिक लाभाची रक्कम एडीबी विम्याच्या मूळ रक्कमेच्या 2 पट असते
    • पॉलिसी अंतर्गत प्रत्येक विमाधारक व्यक्तीला, पहिल्या पॉलिसी वर्षात जास्तीत जास्त 15 दिवस आणि त्यानंतर दर वर्षी 45 दिवसांपर्यंत हा लाभ मिळू शकतो.
    • पॉलिसी अंतर्गत प्रत्येक विमाधारक व्यक्तीला, पॉलिसीच्या जीवनकाळात जास्तीत जास्त 360 दिवसांसाठी हा लाभ मिळू शकतो

    5. अॅम्ब्युलन्स बेनिफिट

    • जर विमा उतरवलेल्या व्यक्तीला अपघात किंवा आजारपणामुळे हॉस्पिटलायझेशन करावे लागले आणि ती मोठ्या सर्जिकल फायद्यांसाठी पात्र असेल, तर ती रुग्णवाहिकेचा लाभ देखील घेऊ शकते.
    • त्याला / तिला रुग्णालयात नेण्यासाठी कोणत्याही आपत्कालीन रुग्णवाहिकेचे शुल्क आकारले जात असल्यास, हा लाभ लागू होतो
    • हा कमाल रु. 1000 साठी लागू आहे.

    6. प्रीमियम माफी लाभ (पीडब्ल्यूबी)

    • जर एलआयसी पॉलिसीधारकांना, ज्यासाठी त्यांना एमएसबी किंवा प्रमुख शस्त्रक्रिया फायदे मिळाले आहेत, अशी मोठी शस्त्रक्रिया करावी लागली असेल, तर त्यांना प्रीमियम माफीचा लाभ मिळू शकतो
    • या लाभाअंतर्गत, विमाधारकाला शस्त्रक्रियेच्या दिनांकानंतर प्रीमियमच्या देय दिनांकापासून संपूर्ण एक वर्षाच्या प्रीमियमची माफी मिळू शकते.

    7. नो क्लेम बेनिफिट (एनसीबी)

    • पॉलिसीधारकाने पॉलिसी वर्षात किंवा दोन स्वयंचलित नूतनीकरण दिनाकांच्या दरम्यान कोणतेही विमा दावे दाखल केले नाहीत, तर तो / ती नो क्लेम लाभासाठी पात्र असेल.
    • एनसीबी रक्कम प्रत्येक विमाधारक व्यक्तीसाठी प्रारंभिक दैनिक लाभाच्या 5% असेल

    8. कर लाभ

    एलआयसी जीवन आरोग्य पॉलिसी प्रीमियम्स हे, भारतीय आयकर कायद्याच्या कलम 80डी अंतर्गत कर सवलतीच्या अधीन आहेत.

    एलआयसी जीवन आरोग्य प्लॅनमधील वगळण्यात येणाऱ्या बाबी

    एलआयसी जीवन आरोग्य प्लॅनद्वारे खालील कारणांमुळे झालेल्या दुखापती किंवा आजारासाठी त्याच्या कव्हरेजमध्ये खालील बाबी वगळल्या जातात:

    • कोणतेही अगोदर अस्तित्वात असलेले रोग किंवा परिस्थिती
    • युद्ध, नौदल किंवा लष्करी कारवाया, दंगलीत सहभाग इत्यादींमुळे झालेली कोणतीही इजा.
    • किरणोत्सर्गामुळे दुषितीकरण
    • गुन्हेगारी किंवा बेकायदेशीर कृत्ये
    • भूकंप, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्ती.
    • रेसिंग, स्कूबा डायव्हिंग, बंजी जंपिंग यांसारख्या धोकादायक खेळांमध्ये सहभाग
    • स्वत: ला दुखापत किंवा आत्महत्येचा प्रयत्न
    • ड्रग्ज, अल्कोहोल किंवा मादक पदार्थांचा गैरवापर
    • अपघाती दुखापतीच्या उपचारांसाठी आवश्यक नसलेली प्लास्टिक सर्जरी
    • जन्मजात परिस्थिती
    • HIV/AIDSसारख्या एसटीडी
    • वंध्यत्व किंवा नसबंदी
    • गर्भधारणा किंवा बाळाच्या जन्माशी संबंधित परिस्थिती
    • साथीचे रोग किंवा परिस्थिती
    • दंत उपचार

    एलआयसी जीवन आरोग्य प्लॅन ऑनलाईन कसा खरेदी करावा?

    पॉलिसी ऑनलाइन खरेदी करण्याची प्रक्रिया खाली दिली आहे:

    • एलआयसी जीवन आरोग्य पॉलिसी खरेदी करण्यासाठी इच्छुक व्यक्ती, एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा कोणत्याही नोंदणीकृत विमा एग्रीगेटरवर प्रवेश करू शकतात.
    • त्यांनी ऑनलाइन प्रदान केलेल्या अर्ज विनंती फॉर्मवर त्यांचे वैयक्तिक तपशील प्रदान करणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, वय, जन्मदिनांक, पत्ता, मोबाईल नंबर, आवश्यक असलेले विमा कव्हर आणि आरोग्य तपशील जसे की, कोणतेही अगोदर अस्तित्वात असलेले रोग किंवा ते मद्य किंवा तंबाखूचे सेवन करतात किंवा नाही या बाबींचा समावेश असेल.
    • त्यानुसार, वापरकर्त्यांना कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल किंवा एलआयसीचा विमा प्रतिनिधी त्यांना खरेदी प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी परत कॉल करेल.
    • कागदपत्रांची पडताळणी केल्यावर, प्रीमियमचे कोट सादर केले जाईल. वापरकर्ता सहमत असल्यास, तो / ती पुढे जाऊ शकतो आणि सुचवलेल्या पेमेंट पद्धतींनुसार खरेदी करू शकतो

    आवश्यक कागदपत्रे

    पॉलिसी खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे: ओळख, वय आणि पत्त्याचे पुरावे, जसे की पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, युटिलिटी बिले इ.

    दावे दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: हॉस्पिटल डिस्चार्ज सारांश किंवा डिस्चार्ज प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन, सर्व तपासणी आणि निदान अहवाल, पेमेंट इनव्हॉइस किंवा पावत्या, वैद्यकीय बिले, दाव्याचा फॉर्म, फोटो आयडी

    एलआयसी जीवन आरोग्य प्लॅन - वारंवार विचारले जाणारे प्रश्न

     
    top
    Close
    Download the Policybazaar app
    to manage all your insurance needs.
    INSTALL