चोलामंडलम आरोग्य विमा
चोला एमएस आरोग्य विमा हा सर्वसामान्य माणसांना विचारात घेऊन बनवण्यात आला आहे.
Read More
चोलामंडलम आरोग्य विमाकंपनी बद्दल माहिती
चोला एमएस ही भरातातील नवीन आणि अग्रगण्य विमा कंपनी मधील एक कंपनी आहे. या कंपनीची दुहेरी मालकी आहे. एक हक्क मुरूगप्पा ग्रुप व दूसरा हक्क मितसुई सुमितोतो यांच्याकडे आहे. तुम्हाल या कंपनीच्या विमा योजना मध्ये भारतीय आणि जपानी हमी मिळते. चोला एमएस चे मुख्य कार्यालय चेन्नई येते आहे. दोन्ही ग्रुप एकत्रितपणे आरोग्य विमा व्यतिरिक्त मोटर, जीवन आणि इतर विविध प्रकारचे विमा तुम्हाला उपलब्ध करून देतात.
तुमच्या आवडीचे चोलामंडलम आरोग्य विमा कव्हरेज निवडा
एका दृष्टिक्षेपात चोलामंडलम आरोग्य विमा
वैशिष्ट्ये |
तपशील |
नेटवर्क हॉस्पिटल्स |
९००० + |
इन्शुरेंस दावे |
४०.६७ % |
नूतनीकरण |
आजीवन |
विलंब अवधि |
३ वर्ष |
चोला एमएसआरोग्य विमा ची वैशिष्ट्ये
चोला एमएस ची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत:
या योजने अंतर्गत तुम्हाला ५३९ पेक्षा अधिक डे केअर प्रक्रिया चा लाभ घेता येतो.
- वैयक्तिक आणि कौटुंबिक फ्लोटर कव्हरेज:
तुम्ही विमा वैयक्तिक किंवा कौटुंबिक आधारावर खरेदी करू शकता.
- पहिल्या दिवसापसूनच नवीन बाळाला कव्हर:
विमा सुरू झाल्यानंतरच्या १२ महिन्याचे आई चे कव्हर बाळाला त्याच्या जन्माच्या पहिल्या दिवसापसूनच सेवा देते.
- विम्याची १००% रक्कम पुन्हा संचयीत:
जर विम्याची रक्कम आणि बोनस काही कारणास्तव कमी पडले तर १००% रक्कम पुन्हा संचयीत केली जाते. ही सेवा असंबधित दव्यांसाठी ऊपलब्ध आहे.
- आयुष आणि डोमिसिलिअरी सेवा बिना निर्बंध कव्हरेज:
आयुष आणि डोमिसिलिअरी अंतर्गत तुमच्या विमा रकमेवर कोणतेही निर्बंध लावता येत नाहीत.
रूग्णालयात दाखल झाल्यावर १० दिवस सोबत असलेल्या व्यक्तीचा सर्व खर्च विम्या अंतर्गत कव्हर केला जातो.
- रस्त्यावरील अपघात उपचारांसाठी अतिरिक्त विमा:
विमा निर्धारित रक्कमेच्या २५% टक्के रक्कम तुम्हाला रस्ता अपघात उपचारा करता देण्यात येते. ही रक्कम ३ लाख पेक्षा अधिक नसावी.
उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टर चे मत घेण्यासाठी झालेला खर्च विमाधरकाला परत केला जातो.
रुग्णालयात दाखल झालेल्या विमाधरकाला भेटण्यासाठी आलेल्या कुटुंबातील सदस्यांना हवाई प्रवासाचा खर्च दिला जातो. हि सवलत विमा धरकाची परिस्थिती जीवघेणी असेल तरच पुरवली जाते.
विमा कालावधी मध्ये दर दोन वर्ष जर तुम्ही एकही दावा केला नाही तर तुम्हाला मोफत आरोग्य तपासणी दिली जाते.
विम्याच्या हफ्त्यांवर तुम्ही ८० सी च्या अंतर्गत सवलत घेऊ शकता.
चोलामंडलम आरोग्य विमामध्ये समाविष्ट असलेल्या सबबी
पुढील सबबी चोला एमएसच्या आरोग्य विमा योजनांमध्ये समाविष्ट आहेत:
विमापुरवठादार हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी पैसे देतो. यात अपघातातील शारीरिक दुखापत किंवा कोणत्याही आजारासाठी २४ तासांपेक्षा जास्त हॉस्पिटलायझेशन आवश्यक असते विम्याच्या रकमेपर्यंत खर्च कव्हर केला जातो. खोली आणि बोर्डिंगची किंमत, नर्सिंग शुल्क, अतिदक्षता विभाग, डॉक्टरांची फी, ऑक्सिजन, रक्त, औषधे आणि औषधे इत्यादींचा समावेश देखील कव्हर मध्ये आहे.
- हॉस्पिटलायझेशनपूर्व आणि नंतरचा खर्च:
हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी ३० दिवसांचा आणि डिस्चार्ज झाल्यानंतर ६० दिवसांचा खर्च विमाकर्ता पुरवतो. दिवस कालावधी विमा योजनेनुसार बदलतात.
हे त्या प्रक्रियेशी किंवा उपचारांशी संबंधित आहे ज्याला २४ तास रुग्णालयाची गरज नसते. तुम्हाला १४१ दिवस डे केअर प्रक्रियेचा खर्च विमा रक्कम पर्यंत मिळतो.
- डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन:
जेव्हा विमाधारक हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही किंवा हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्यामुळे घरीच उपचार केले जातात, तेव्हा विमाकर्ता डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशनशी संबंधित वैद्यकीय खर्चासाठी पैसे देतो. हा लाभ घेण्यासाठी हॉस्पिटलायझेशन किमान ३ दिवस तरी चालू राहावे. एक चालू वर्षात तुम्हाला ७ दिवसांच्या खर्चाची भरपाई करते.
आयुर्वेद, होमिओपॅथी, योग आणि निसर्गोपचार, युनानी आणि सिद्धा यांसारख्या गैर-अॅलोपॅथी उपचारांद्वारे अपघाती शारीरिक दुखापत किंवा कोणत्याही आजाराच्या उपचारांसाठी २४ तासांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे झालेल्या वैद्यकीय खर्चाची भरपाई विमा कंपनी विम्याच्या रकमेपर्यंत देते.
चोलामंडलम आरोग्य विमा समाविष्ट नसलेल्या सबबी
पुढील सबबी चोला एमएसच्या आरोग्य विमा योजनांमध्ये समाविष्ट नाहीत:
युद्ध किंवा युद्ध, आक्रमण, परकीय शत्रूंची कृत्ये, बंड, बंडखोरी, मार्शल लॉ इत्यादींमुळे झालेल्या दुखापतीच्या उपचारांसाठी कोणतेही कव्हरेज दिले जात नाही.
- अल्कोहोल किंवा मादक पदार्थांचा गैरवापर:
विमा कंपनी अल्कोहोल, सिगारेट आणि संबंधित उत्पादने, प्रतिबंधित पदार्थ किंवा अंमली पदार्थांचा वापर, किंवा गैरवापर यामुळे झालेल्या दुखापती किंवा आजार
- स्वत:ला हानी पोहोचवणाऱ्या कृती:
विमाधारक स्वत:ला दुखापत किंवा आत्महत्येचा प्रयत्न करण्याशी संबंधित कोणतीही कृती केल्यामुळे किंवा प्रयत्न केल्यामुळे झालेल्या दुखापती किंवा आजारावरील उपचार
- कॉस्मेटिक किंवा प्लॅस्टिक सर्जरी:
कॉस्मेटिक उपचार, प्लास्टिक सर्जरी किंवा कोणत्याही सौंदर्यात्मक प्रक्रियेमुळे उद्भवणारे वैद्यकीय खर्च आघातजन्य दुखापत, भाजणे इत्यादींमुळे आवश्यक नसल्यास
लैंगिक संक्रमित रोग किंवा आजाराच्या उपचारांसाठी विमा प्रदात्याकडून कोणतेही विमा संरक्षण दिले जात नाही.
चोला एमएस आरोग्य विमा
तुम्ही चोला चे विमा सर्वसमावेशक किंवा वैयक्तिक यापैकी निवडू शकता. या योजना तुम्हाला तुमचा जोडीदार, मुले किंवा कुटुंबतील इतर सदस्यांपर्यंत वाढवता येतो. यानुसार तुम्ही योजनेत तुमच्या गरजेनुसार कव्हर वाढवू किंवा कमी करू शकता. हे कव्हर तुमचा विमा तुमच्यासाठी जितका वैयक्तिक करता येईल तितका करण्यासाठी उपयोगात अनू शकता. चोला एमएस योजना ही विविध प्रकारचे प्लान तुम्हाला उपलब्ध करून देते. प्रत्येक प्लानची वेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत, जे प्रत्येकला दुसरींपासून वेगळा बनवतात. पुढे प्रत्येक चोला च्या प्लानचे विस्तारीत विश्लेषण दिलेले आहे.
-
- यात विमा रक्कम ही २ लाख ते १० लाख पर्यन्त निर्धारित केली जाते.
- रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व दाखल झाल्यानंतरचा ३० आणि ६० दिवसांचा वैद्यकीय खर्च तुम्हाला पुरवला जातो.
- या योजनेमध्ये डेकेर प्रक्रियांचा समावेश आहे, ज्यांच्यासाठी २४ तास रुग्णालयाची आवश्यकता नसते.
- डॉमिसईलीयरी उपचार जर ७ दिवसांच्या अंत असतील तर एक वर्षात ते कव्हर केले जाते.
- आपतकालीन रुग्णवाहिकेचा १००० पर्यन्तचा खर्च हा पुरवला जातो.
- अवयव दान व अवयव प्रत्यारोपण याचा खर्च विमयामध्ये समविष्ठ आहे.
- आयुष व्यतिरिक्त होमियोपथी, आयुर्वेद, उणणी, सिद्ध यांसारख्या सोई देखील उपलब्ध करून दिल्या जातात.
- विमापूर्व आरोग्य तपासणी मध्ये ५० % खर्चाची विमा द्वारे परतफेड केली जाते.
- जर विमा धारकाचे वे दाव्याच्यावेळेस ५५ पेक्षा अधिक असेल तर प्रत्येक दाव्यावर १०% सवलत दिली जाते.
- विमा चे नूतनीकरण आयुष्यभर करता येते.
पात्रता:
- कव्हर घेण्यासाठी विमा धारकाचे वय १८ ते ६५ च्या दरम्यान असावे.
- जर एक पालक विमा मध्ये कव्हर होत असेल तर लहान मुलाला त्याच्या वयाच्या २६ व्या वर्षापर्यंत कव्हर दिले जाते.
- विमा योजनेची मर्यादा तुम्ही तुमचा जोडीदार, आश्रित पाल्य, आश्रित पालक आणि सासरे किंवा सासू पर्यन्त वाढवू शकता.
- ४५ वर्षानंतर विमा खरेदी करायचा असल्यास तुम्हाला संपूर्ण वैद्यकीय चाचणी करावी लागेल.
-
- विम्याची रक्कम रु. ३ लाख ते रु. १५ लाखांपर्यंत असते.
- रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा अनुक्रमे ६० आणि ९० दिवसांसाठीचा खर्च समाविष्ट आहे
- १४१ डेकेअर प्रक्रिया विमा मध्येसमाविष्ट आहेत ज्यांना २४ तास रुग्णालयाची आवश्यकता नसते.
- एका विमा वर्षात जास्तीत जास्त ७ दिवस घरी उपचार केले जातात तेथे डोमिसिलरी उपचारअंतर्गत कव्हर दिले जाते.
- आपातकाळात रुग्णवाहिकेचा शुल्क रु. २००० प्रति हॉस्पिटलायझेशन साठी कव्हर केला जातो
- अवयव प्रत्यारोपणाच्या वेळी अवयवदात्याचा उपचाराचा खर्च कव्हर केला जातो
- आयुष लाभ आहे जेथे आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अंतर्गत रुग्णांतर्गत उपचारांसाठीचा वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो.
- विमापूर्व आरोग्य तपासणीच्या खर्चाच्या ५०% रक्कम परतफेड केली जाईल
- खोलीचे भाडे दर, सल्लामसलत शुल्क आणि निदान खर्च यावर कोणतीही मर्यादा लावली जात नाही
- प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी ५% संचयी बोनस आहे, जो विम्याच्या रकमेच्या कमाल ५०% रक्कमेच्या अधीन आहे
- पॉलिसीवर आजीवन नूतनीकरण सवलत उपलब्ध आहे
पात्रता
- १८ वर्षे ते ६५ वरवयापर्यंत कव्हरेज प्रदान केले जाते.
- जर एक पालक या योजनेत समाविष्ट असेल तर तीन महिन्यांपासून ते २६ वर्षांपर्यंत मुलाला व मुलीला कव्हर प्रदान केले जाऊ शकते
- या योजनेमध्ये स्वत:साठी, जोडीदारासाठी, आश्रित मुलांसाठी आणि आश्रित पालकांसाठी किंवा सासू आणि सासऱ्यांसाठी कव्हरेज आहे.
- वयाच्या ४५ वर्षांनंतर पॉलिसीपूर्व आरोग्य तपासणी आवश्यक आहे.
-
- विम्याची रक्कम रु. ३ लाख ते रु. २५ लाखांपर्यंत असते.
- देशभरातील पॅनेलीकृत रुग्णालयांमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची सुविधा
- रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा अनुक्रमे ६० आणि ९० दिवसांसाठीचा खर्च समाविष्ट आहे
- १४१ डेकेअर प्रक्रिया समाविष्ट आहेत ज्यांना २४ तास हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नाही
- एका पॉलिसी वर्षात जास्तीत जास्त ७ दिवस घरी उपचार केल्यास डोमिसिलरी उपचार कव्हर केले जातात
- आपातकाळात रुग्णवाहिकेचा शुल्क रु. २००० प्रति हॉस्पिटलायझेशन कव्हर केले जातात
- अवयव प्रत्यारोपणाच्या वेळी अवयवदात्याचा उपचाराचा खर्च कव्हर केला जातो
- आयुष लाभ आहे जेथे आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अंतर्गत रुग्णांतर्गत उपचारांसाठीचा वैद्यकीय खर्च कव्हर केला जातो.
- पॉलिसी जारी केल्यावर विमापूर्व आरोग्य तपासणीच्या खर्चाच्या १००% परतफेड केली जाते
- बालकांना रूग्णालयात दाखल केल्यास दैनिक भत्ता रु. ५०० हा ७ दिवसांसाठी दिला जातो
- जेव्हा किमान १० दिवस हॉस्पिटलायझेशन आवश्यक असते तेव्हा रु. १०,००० च्या एकरकमी स्वरूपात विस्तारित हॉस्पिटलायझेशन भत्ता दिला जातो.
- विमाधारक व्यक्तीला १४ निर्दिष्ट आजार आणि कोणताही अपघात झाल्याचे निदान झाल्यास दुप्पट विमा लाभ दिला जातो
- प्रत्येक दोन क्लेम वर्षासाठी एकदा मोफत आरोग्य तपासणी केली जाते
- खोलीचे भाडे, निदान शुल्क आणि सल्ला शुल्क विमा समाविष्ट आहे
- प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी ५०% संचयी बोनस आहे, जो मूळ विमा रकमेच्या कमाल १००% च्या अधीन आहे
- पॉलिसीवर आजीवन नूतनीकरण उपलब्धआहे
पात्रता
- १८ वर्षे ते ६५ वर्षे वयापर्यंत कव्हरेज प्रदान केले जाते.
- जर एका पालकाचा या योजनेत समावेश असेल तर तीन महिन्यांपासून ते २६ वर्षांपर्यंतच्या चार मुलांना कव्हर प्रदान केले जाते
- या योजनेमध्ये स्वत:साठी, जोडीदारासाठी, आश्रित मुलांसाठी, आश्रित पालकांसाठी किंवा सासरे आणि भावंडांसाठी कव्हरेज आहे.
- वयाच्या ४५ वर्षांनंतर पॉलिसीपूर्व आरोग्य तपासणी आवश्यक आहे.
-
- विम्याची रक्कम रु. ५ लाख ते रु. २५ लाखांपर्यंत असते
- विमा गंभीर आजार आणि अपघातांसाठी मूळविम्याच्या दुप्पट रक्कम प्रदान करते
- नवजात बाळाला हॉस्पिटलायझेशनसह १ लाख रुपयांपर्यंत मातृत्व कवच दिले जाते
- दातांच्या उपचारांसाठी बाह्यरुग्ण कव्हर / चष्मा / श्रवणयंत्र / कॉन्टॅक्ट लेन्स १०,००० रुपये दर २ वर्षांनीदेण्याची तरतूद आहे
- गंभीर आजारासाठी तज्ञांचे मत जाणण्यासाठी रु. २५,००० पर्यंत रक्कम दिली जाते.
-
ही विमा योजना सर्वसमावेशक विमा संरक्षण अंतर्गत कुटुंबातील सदस्यांच्या हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी फ्लोटिंग रकमेच्या आधारावर प्रदान करते. वैयक्तिक विम्याच्या रककमेच्या आधारावर वैयक्तिक अपघात संरक्षण कव्हर प्रदान करते. योजनेची इतर वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- या योजनेंतर्गत मिळणारे लाभ रु. ३ लाख, ४ लाख, आणि रु. ५ लाख.रककमेवर आधारित विमा चे दोन प्रकार आहेत- पर्ल आणि रोयल
- देशभरातील सर्व पॅनेल रुग्णालयांमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सुविधा
- रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च अनुक्रमे ३० आणि ६० दिवसांसाठी समाविष्ट आहे
- १४१ डेकेअर प्रक्रिया समाविष्ट आहेत ज्यांना २४ तास हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नाही
- एका पॉलिसी वर्षात जास्तीत जास्त ७ दिवस घरी उपचार केले असल्यास तेथे डोमिसिलरी उपचार विमा अंतर्गत कव्हर केले जातात
- आपातकाळात रुग्णवाहिकेचा शुल्क रु. २००० प्रति हॉस्पिटलायझेशन कव्हर केले जातात
- अवयव प्रत्यारोपणाच्या वेळी अवयवदात्याचा उपचाराचा खर्च कव्हर केला जातो
- या पॉलिसीच्या रॉयल प्लॅन अंतर्गत दुहेरी संरक्षण आहे. जेथे फ्लोटर आधारावर हॉस्पिटलायझेशन कव्हर आणि वैयक्तिक आधारावर वैयक्तिक अपघात कव्हर विमा धारकला उपलब्ध आहे
- पॉलिसीवर आजीवन नूतनीकरण उपलब्ध आहे
पात्रता
- १८ वर्षे ते ६५ वर्षपर्यंत कव्हरेज प्रदान केले जाते.
- जर एक पालक या योजनेत समाविष्ट असेल तर तीन महिन्यांपासून ते 2६ वर्षांपर्यंतच्या दोन मुलांचा समावेश केला जाऊ शकतो.
- या योजनेत स्वत:साठी, जोडीदारासाठी आणि अवलंबित मुलांसाठी कव्हरेज आहे
- वयाच्या ५५ वर्षानंतरच पॉलिसीपूर्व आरोग्य तपासणी आवश्यक आहे.
-
ही एक आरोग्य विमा योजना आहे ज्यामध्ये हॉस्पिटलायझेशन खर्च तसेच हॉस्पिटलायझेशन नसलेल्या (ओ पी डी - बाह्यरुग्ण विभाग) खर्चाचा समावेश होतो. योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- या विमा योजनेंतर्गत मिळणारे लाभ रु. १ लाख ते रु. ५ लाख रक्कमेपर्यंत आहेत.
- देशभरातील पॅनेलीकृत रुग्णालयांमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सुविधेमध्ये प्रवेश विमाधारकला घेत येतो.
- रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा अनुक्रमे ६० आणि ९० दिवसांसाठीचा खर्च समाविष्ट आहे
- १४१ डेकेअर प्रक्रिया समाविष्ट आहेत ज्यांना 24 तास हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नाही
- विमा नूतनीकरण आजीवन शक्य आहे
- खोलीचे भाडे आणि आयसीयू रूम भाडे शुल्क टक्केवारीत समाविष्ट आहे
- रुग्णालयात दाखल न करता आजार किंवा दुखापतीवर उपचार कव्हर केले जातात
- प्रसूतीपूर्व आणि प्रसवोत्तर खर्च कव्हर केला जातो
- सर्व दंत उपचारांचा समावेश आहे
- अॅलोपॅथी तसेच आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अंतर्गत उपचारांचा समावेश आहे.
- वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार आणि वैध प्रिस्क्रिप्शनसह, चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स, श्रवणयंत्र, कृत्रिम उपकरणे इत्यादींचा खर्च समाविष्ट केला जातो.
- प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी ५% संचयी बोनस आहे, जो विम्याच्या रकमेच्या कमाल ५० % च्या अधीन आहे
पात्रता
- १८ वर्षे ते ६५ वर्षे वयापर्यंत कव्हरेज प्रदान केले जाते.
- जर एकही पालक या योजनेत समाविष्ट असेल तर तीन महिन्यांपासून ते ३५ वर्षांपर्यंतच्या दोन मुलांचा समावेश केला जाऊ शकतो. ३५ चीवयोमर्यादा स्त्री मुली साठी आणि पुरुष मुलासाठी २५ ची वयोमार्यादा आहे
- या योजनेत स्वत:साठी, जोडीदारासाठी आणि अवलंबित मुलांसाठी कव्हरेज आहे
- वयाच्या ५५ वर्षानंतरच पॉलिसीपूर्व आरोग्य तपासणी आवश्यक आहे.
-
योजनेअंतर्गत तुम्हाला तीन उप-श्रेणी ऑफर केल्या जातात. ज्या स्टँडर्ड, सुपीरियर आणि एडवांस्ड याप्रमाणे आहेत. या उप-श्रेणी विम्याच्या रकमेनुसार विभागल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे काही फायदे देखील वेगळे आहेत. विमाधारक व्यक्तीला या पॉलिसी अंतर्गत त्याची योजना श्रेणी निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- या योजनेंतर्गत मिळणारे लाभ रु. १५ लाख पर्यंतच्या फ्लोटर विमा रकमेसाठी आहेत.
- १४१ डेकेअर प्रक्रिया समाविष्ट आहेत ज्यांना २४ तास हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नाही
- अल्पवयीन व्यक्तीच्या सोबत राहण्यासाठी दररोज रोख भत्ता दिला जातो
- आपातकाळात रुग्णवाहिकेचा शुल्क रु. १००० ते ३००० पर्यंत समाविष्ट आहे. निवडलेल्या योजनेच्या प्रकारावर अवलंबून ही रक्कम निर्धारित केली जाते.
- प्रसूतीपूर्व आणि प्रसवोत्तर खर्च कव्हर केला जातो
- दंत उपचार प्रगत योजना अंतर्गत समाविष्ट आहेत
- आयुर्वेद अंतर्गत उपचार प्रगत योजनांतर्गत समाविष्ट आहेत
- वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार आणि वैध प्रिस्क्रिप्शनसह, चष्मा, कॉन्टॅक्ट लेन्स, श्रवणयंत्र, कृत्रिम उपकरणे इत्यादींचा खर्च प्रगत योजनेंतर्गत समाविष्ट केला जातो.
- सुपीरियर आणि अॅडव्हान्स प्लॅन्स अंतर्गत डोमिसिलरी खर्च कव्हर केला जातो
- सामायिक निवास निवडल्यास दररोज रोख भत्ता आहे
- मातृत्व खर्च सुपीरियर आणि अॅडव्हान्स प्लॅन अंतर्गत समाविष्ट आहेत
पात्रता
- १८ वर्षे ते ६५ वयापर्यंत कव्हरेज प्रदान केले जाते.
- जर एकही पालक या योजनेत समाविष्ट असेल तर तीन महिन्यांपासून ते २५ वर्षांपर्यंतच्या दोन मुलांचा समावेश केला जाऊ शकतो.
- या योजनेत स्वत:साठी, जोडीदारासाठी आणि अवलंबित मुलांसाठी कव्हरेज उपलब्ध आहे
- वयाच्या ५५ वर्षानंतरच पॉलिसीपूर्व आरोग्य तपासणी आवश्यक आहे.
-
पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या गंभीर आजारांसाठी लवचिक विम्याच्या रकमेच्या पर्यायासोबत एक निश्चित लाभाची आरोग्य विमा पॉलिसी आहे. योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- गंभीर आजारांच्या श्रेणीसाठी एकरकमी पेमेंट
- विम्याची रक्कम रु. ३ लाख ते रु. ५० लाख पासून उपलब्ध
- प्लॅन्सच्या दोन उप-श्रेणी आहेत- स्टँडर्ड आणि अॅडव्हान्स्ड प्लॅन. स्टँडर्ड प्लॅनमध्ये दहा गंभीर आजारांचा समावेश आहे, तर अॅडव्हान्स्ड योजनेत १२ गंभीर आजारांचा समावेश आहे आणि रू. १००० पर्यंत रूग्णवाहिका शुल्क समाविष्ट आहे.
- स्टँडर्ड प्लॅन अंतर्गत समाविष्ट असलेले गंभीर आजार पुढीलप्रमाणे आहेत - विशिष्ट तीव्रतेचा कर्करोग, स्ट्रोक ज्यामुळे कायमस्वरूपी लक्षणे उद्भवतात, निर्दिष्ट तीव्रतेचा पहिला हृदयविकाराचा झटका, उघडी छाती सीएबीजी, मूत्रपिंड निकामी होणे ज्यासाठी नियमित डायलिसिस आवश्यक आहे, सतत लक्षणांसह एकाधिक स्क्लेरोसिस, मुख्य अवयव/ अस्थिमज्जा प्रत्यारोपण, अवयवांचे कायमचे अर्धांगवायू, महाधमनी शस्त्रक्रिया, प्राथमिक फुफ्फुसीय धमनी उच्च रक्तदाब.
- अॅडव्हान्स्ड योजनेत वरील सर्व गंभीर आजार तसेच पार्किन्सन्स डिसीज आणि मोटर न्यूरॉन डिसीज कायमस्वरूपी लक्षणांसह समाविष्ट आहेत
- या योजनेत आजीवन नूतनीकरण आहे
पात्रता
५ ते ६५ वर्षे वयापर्यंत कव्हरेज प्रदान केले जाते.
-
ही अशी योजना आहे जी दररोज विशिष्ट रकमेची तरतूद करते. ही रक्कम विमाधारक रुग्णालयात दाखल झाल्यास कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणली जाते. पॉलिसी सहा वेगवेगळ्या योजनांतर्गत पुढील उप-वर्गीकृत आहे. योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- सामान्य हॉस्पिटलायझेशनसाठी हॉस्पिटल रोख लाभ प्रदान केला जातो ज्यामध्ये विमाधारक व्यक्ती आजारपणामुळे २४ तासांपेक्षा जास्त काळ रुग्णालयामध्ये भरती असल्यास २४ तासांच्या प्रत्येक आणि पूर्ण कालावधीसाठी रोख रक्कम दिली जाते.
- आयसीयू हॉस्पिटलायझेशनसाठी रोख रक्कम प्रदान केली जाते ज्यामध्ये विमाधारक व्यक्ती आजारपणामुळे 24 तासांपेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये भरती असल्यास 24 तासांच्या प्रत्येक सतत आणि पूर्ण कालावधीसाठी दुप्पट रक्कम दिली जाते.
- विमाधारक व्यक्ती २० पेक्षा जास्त दिवस सतत रुग्णालयामध्ये भरती राहिल्यास एकरकमी रक्कम निरोगीपणाचा लाभ या रूपात दिली जाते
- पॉलिसीचे आजीवन नूतनीकरण शक्य आहे
- पॉलिसीपूर्वीच्या आरोग्य तपासणीच्या खर्चाच्या ५० % पर्यंत पॉलिसी जारी केल्यावर परतफेड केली जाते
पात्रता
- १८ वर्षे ते ६५ वर्षे कव्हरेज प्रदान केले जाते.
- जर एकही पालक या योजनेत समाविष्ट असेल तर तीन महिन्यांपासून ते २६ वर्षांपर्यंतच्या दोन मुलांचा समावेश केला जाऊ शकतो
- या योजनेत स्वतःसाठी, जोडीदारासाठी, आश्रित मुलांसाठी, भावंडांसाठी आणि आश्रित पालकांसाठी कव्हरेज आहे.
-
ही एक आरोग्य विमा योजना आहे जी विमाधारक व्यक्तीच्या आणि तिच्या प्रियजनांच्या आरोग्य विम्याच्या गरजा पूर्ण करते. या योजने अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी विशिष्ट विमा रकमेच्या लाभाची तरतूद आहे. योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- स्टँडर्ड, सुपीरियर आणि अॅडव्हान्स प्लॅन्स अंतर्गत योजना उप-वर्गीकृत आहे
- विम्याची रक्कम रु. ३ लाख ते रु. १० लाख आहे.
- १४१ डेकेअर प्रक्रिया समाविष्ट आहेत ज्यांना २४ तास हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नाही
- शेअर्ड ऑक्युपन्सी रूम निवडल्यास दैनिक रोख भत्ता दिला जातो
- प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी ५ % संचयी बोनस आहे, जो विम्याच्या रकमेच्या कमाल ५०% च्या अधीन आहे
- सुपीरियर आणि अॅडव्हान्स प्लॅन्स अंतर्गत किरकोळ साथी भत्ता आहे
- दर दोन वर्षांनी मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी केली जाते
- आपत्कालीन रुग्णवाहिकेचे शुल्क या योजनेमध्ये समाविष्ट आहे
- सुपीरियर आणि अॅडव्हान्स प्लॅन्स अंतर्गत डोमिसिलरी खर्च कव्हर केला जातो
- मातृत्व खर्च सुपीरियर आणि अॅडव्हान्स प्लॅन अंतर्गत समाविष्ट आहेत
- आयुर्वेदिक उपचार अॅडव्हान्स योजनांतर्गत समाविष्ट आहेत
- अॅडव्हान्स योजना अंतर्गत दंत विकार खर्च कव्हर केले जातात
- चष्मा, श्रवणयंत्र आणि इतर अशा बाह्य साधनांची किंमत प्रगत योजनांतर्गत समाविष्ट आहे
- या योजनेत आजीवन नूतनीकरण शक्य आहे
पात्रता
- कव्हर घेण्यासाठी विमा धारकाचे वय १८ ते ६५ च्या दरम्यान असावे.
- जर एकही पालक या योजनेत समाविष्ट असेल तर तीन महिन्यांपासून ते २६ वर्षांपर्यंतच्या दोन मुलांचा समावेश केला जाऊ शकतो
-
या आरोग्य विमा योजने अंतर्गत फ्लोटिंग सम विमा आधारावर किंवा वैयक्तिक विमा रकमेच्या आधारावर उच्च वैद्यकीय खर्चासाठी अतिरिक्त कव्हरेज प्रदान करण्याची तरतूद आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
- या पॉलिसीमध्ये सात योजना आहेत ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध विम्याची रक्कम / कपात करण्यायोग्य संयोजन आहेत
- रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा अनुक्रमे ६० आणि ९० दिवसांसाठीचा खर्च समाविष्ट आहे
- हॉस्पिटलायझेशन खर्च
- आपातकाळात रुग्णवाहिकेचा शुल्क रु. ३००० प्रति हॉस्पिटलायझेशन पर्यंत समाविष्ट आहे.
- या योजनेत आजीवन नूतनीकरण शक्य आहे
पात्रता
- १८ वर्षे ते ६५ वर्षे कव्हरेज प्रदान केले जाते.
- जर एकही पालक या योजनेत समाविष्ट असेल तर तीन महिन्यांपासून ते २६ वर्षांपर्यंतच्या दोन मुलांचा समावेश केला जाऊ शकतो
- ५५ वर्षे आणि त्याहून अधिक वयापर्यंत वैद्यकीय तपासणी केली जात नाही
चोलामंडलम आरोग्य विमा पॉलिसीबाजार वरून कसा खरेदी करावा?
चोलामंडलम आरोग्य विमा कंपनी नेहमी प्रयत्न करते की ग्राहकांचे आयुष्य कसे सोपे आणि चिंता मुक्त होईल, आणि यासाठीच, कंपनी विमा योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने खरेदी करण्याची मुभा देते. तुम्ही कंपनीच्या अधिकृत संकेत स्थाळाला भेट देऊन विमा योजना खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या जवळच्या चोला एमएस च्या शाखेला भेट देऊन, किंवा अधिकृत एजेंट शी संपर्क साधून देखील विमा खरेदी करू शकता. जर तुम्हाला विमा खरेदी करण्याआधी त्याबद्दल काही माहिती हवी असेल किंवा दुसऱ्या योजना तपासून घ्यायच्या असतील तर तुम्ही विमा खरेदी करण्यासाठी पॉलिसीबाजार ची निवड देखील करू शकता. पॉलिसीबाजारवरील विमा खरेदीची प्रक्रिया आगदी सरल आणि सोपी आहे. तुम्हाला यासाठी पुढील पायऱ्या फॉलो कराव्या लागतील.
पॉलिसीबाजारच्या www.policybazaar.com या अधिकृत संकेत स्थाळाला भेट द्या.
होम पेज वरून आरोग्य विमा टॅब वर क्लिक करा.
योजनांची तुलना करण्यासाठी तुम्ही इन्शुरन्स गुणक पेजवर जाऊन तुलना करा. यामध्ये तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितिस योग्य योजना निवडता येईल.
तुमची मूलभूत माहिती पुरवा, जसे की तुमचे नाव, संपर्क क्रमांक, योजनेचा प्रकार, वय इत्यादी.
तुम्ही पुरवलेल्या माहितीवरून, गुणक वेगवेगळ्या योजना सुचवेल
चोला एमएस च्या योजनांमधील तुमच्या सर्व सोईना अनुरूप असेल ती योजना निवडा.
प्रीमियम ऑनलाइन भरल्यानंतर तुम्हाला चोला एमएस विमा योजनेचे कागदपत्र तुम्हाला ईमेल द्वारे सॉफ्ट कॉपी रूपात पाठवेल.
चोलामंडलम आरोग्य विमाचे नूतनीकरण कसे करावे?
विमा योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी तुम्हाला पॉलिसी कालावधी संपण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर ठराविक कालावधीपर्यंत तुम्ही विम्याचे नूतनीकरण करू शकता. विमा खरेदी करण्याप्रमानेच विमा नूतनीकरण देखील पॉलिसीबाजार वरून करणे पुढील पायऱ्यांमुळे अतिशय सोपे होते.
- policybazaar.comया संकेत स्थळावार जाऊन भेट द्या.
- पॉलिसी बाजारच्या आरोग्य विमा नूतनीकरण टॅब वर क्लिक करा
- आरोग्य नूतनीकरण बटणावर क्लिक करा
- तुमची जन्मतारीख, पूर्व पॉलिसी क्रमांक टाका
- एकदा तुमची खात्री झाल्यावर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून प्रीमियम ऑनलाइन भरून विमा नूतनीकरणकरा.
- प्रीमियमचे यशस्वीरित्या पेमेंट झाल्यावर, तुमच्या पॉलिसीचे नूतनीकरण होईल.
- विमा नूतणीकरणाची माहिती तुम्हाला तुमच्या ईमेल द्वारे कळवली जाईल.
चोलामंडलम आरोग्य विमा दावे
तुम्ही दोन प्रकारे चोलामंडलम आरोग्य विमा दावे सादर करू शकता. यात कॅशलेस व प्रतिपूर्ती यांचा समावेश आहे.
कॅशलेस दावे:
यासाठी तुम्ही आधी थेट रुग्णालयाला भेट द्या. हे हॉस्पिटल चोलाच्या संपर्क शृंखला मध्ये असावं. तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत ४८ तासाच्या आत आणि नियोजित प्रवेशाच्या वेळी ७२ तासाच्या आत हेल्प डेस्क वर पुढील क्रमांक वर १८००-२०८-५५४४ वर संपर्क साधू शकता. तुम्हाला पुढील माहिती पुरवावी लागेल.
- विमाधरकाचे नाव
- विमा क्रमांक
- रूग्णालयात दाखल होण्याची वेळ आणि दिनांक
- समस्येचे स्थान आणि स्वरूप
- तुमचा संपर्क तपशील
नेटवर्क रूग्णालयात दाखल होण्यासाठी
- तुम्हाला आधी प्रती पूर्ती करावी लागेल. त्यासाठी रुग्णालयाच्या विमा डेस्क ला भेट द्या.
- तुमचा विमा आणि योग्य ते ओळख पत्र दाखवा
- रुग्णालय तुमचा प्रतिपूर्ती अर्ज चोला कडे अधिकृत करण्यासाठी पाठवेल.
अधिकृतता आणि डिस्चार्ज
- डिस्चार्ज देताना, रुग्णालय सर्व जरुरी कागदपत्र चोलाकडे मंजुरीसाठी पुरवेल.
- चोला सर्व कागदपत्रांचे पुनरावलोकन करेन व विमाच्या नियम आणि अटिंनुसार बिलाच्या अंतिम रक्मेला अधिकृत करेल.
प्रतिपूर्ती:
आधी रुग्णालयाला पैसे द्या आणि मग विम्याचा दावा करा
चोला ला एसएमएस द्वारे पूर्व सूचना द्या. तुम्ही नियोजित रुग्णालयात दाखल होणीसाठी हेल्प डेस्क ल १८००-२०८-५५४४ वर संपर्क साधू शकता.
रुग्णालयात दाखल:
विमाधारकाला रुग्णालयात दाखल करून घ्या आणि उपचारला सुरवात करा. उपचार झाल्यानंतर तुम्ही थेट रुग्णालयात पैसे द्या
डिस्चार्ज मिळाल्यावर, रुग्णालयातून सर्व कागदपत्रे, वैद्यकीय अहवाल, पावत्या आणि डिस्चार्ज प्रमाणपत्र मूळ स्वरूपात गोळा करा.
प्रतिपूर्ती दावे:
डिस्चार्ज मिळल्याननंतर तुम्ही ३० दिवसांच्या आत तुमच्या प्रतिपूर्ती दाव्याची फाइल विमा कंपनीकडे पाठवावी:
- दाव्याचा अर्ज योग्यरित्या पूर्ण आणि स्वाक्षरी करून भरावा.
- मूळ डिस्चार्जचा सारांश हॉस्पिटलच्या लेटर हेडमध्ये आणि डॉक्टरांच्या चिन्हासह सर्व उपचार तपशीलांसह सील बद्ध पद्धतीने अर्ज सोबत पूरवावा. पुढील गोष्टींचा समावेश तुमच्या अर्ज सोबत असावा.
- रूग्णालयातील खर्चाची पावती ज्यावर खर्चाचे विश्लेषण नमूद असेल.
- बिल भागावल्याची पावती आणि तपासणी अहवाल
- सर्व फार्मसी बिले संबंधित प्रिस्क्रिप्शन
- जेथे लागू असेल तेथे स्टिकर्स किंवा बीजक लावा
- रोड ट्रॅफिक अपघात (आर टी ए ) उपचारासोबत, एफआयआर FIR आणि/किंवा मेडिको कायदेशीर प्रमाणपत्र (एम एल् सी) ची प्रत आवश्यक असेल.
- १ लाख रुपयांवरील दाव्यांसाठी लाभार्थीचा ओळख आणि निवासस्थान पुरवा कागदपत्रे
दावा मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला विमा कंपनी पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार प्रतिपूर्ती देन्यात येईल. आवश्यक असल्यास, विमाकर्ता अतिरिक्त कागदपत्रे मागवू शकतो.
आणीबाणी/ आपातकाळ
आणीबाणीच्या परिस्थितीत, पॉलिसीमध्ये अट समाविष्ट आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधा. तुम्ही चाचणीसाठी विमा दस्तऐवज देखील तपासू शकता
एक पूर्ण पूर्व-अधिकृत अर्ज रुग्णालयमध्ये, रुग्ण दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत विमा कंपनीला पाठवणे आवश्यक आहे.
सहाय्यासाठी तुम्ही आमच्या आरोग्य हक्क संघाशी देखील संपर्क साधू शकता
विमा दाव्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
तुमचा विमा दावा यशस्वीरित्या वाटवला जाण्यासाठी तुम्हाला दाव्याच्या अरजयासोबत पुढील कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे:
- योग्यरित्या भरलेला दावा अर्ज
- रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देणारे डॉक्टर चे प्रमाणपत्र
- रुग्णालयाने दिलेले डिस्चार्ज प्रमाणपत्र
- रुग्णालयाच्या बिलची मूळ प्रत
- डॉक्टरची सल्ला कागदपत्रे, वैद्यकीय चाचण्या, औषध प्रिस्क्रिप्शन
- शास्त्रक्रियेत वापरलेल्या प्रतयरोपनाचे स्टिकर
- इतर दिलेली बिले
- आपघाताच्या बाबतीत प्रथम माहिती अहवाल
- मेडिको लीगल सर्टिफिकेट
- विमाधारकाचे बँक तपशील
चोलामंडलम आरोग्य विमा प्रीमियम गणना कशी करावी?
विम्याचा प्रीमियम हा विमा खरेदी करते वेळेसच ठरवला जातो. विमा गणना करण्यासाठी पुढील घटक हे विचारात घेतले जातात:
- विमाधारकाचे वय
- पूर्वअस्तीतवातील आजार
- जीवनशैली
- कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास
- तंबाखू, दारू किंवा आमली पदार्थांचे व्यसन
- विम्याची रक्कम
चोलामंडलम शृंखला रुग्णालय
शृंखला रुग्णालय हे देशभरातील काही निवडक रुग्णालये आहेत, जेथे तुम्ही आपातकाळात कॅशलेस उपचार करून घेऊ शकता. चोला एमएस काळजीपूर्वक देशातील सर्वोत्तम रुग्णालये निवडते, जेथे तुम्ही सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार घेऊ शकता. सध्या चोला एमएस च्या शृंखला रुग्णालयांमध्ये तब्बल ९००० पेक्षाही अधिक रुग्णालयांचा समावेश आहे. हि रुग्णालये देशभरात सर्वत्र आहेत, त्यामुळे तुम्ही कोठेही आणि कधीही आपातकाळ आल्यास, कोणतीही चिंता न बाळगता उपचार करून घेऊ शकता.
चोलामंडलम आरोग्य विमाशी संपर्क कसं साधावा?
तुमच्या विम्यासंबंधित असलेल्या कोणत्याही तक्रारीचे निवारण करण्यसाठी तुम्ही चोला एमएस च्या १८०० २०८ ९१०० या टोल फ्री क्रमांकावर कधीही संपर्क साधू शकता. ७३०५२३४४३३ या व्हॉटसअॅप क्रमांकावर ही पाठवून देखील चोला एमएस शी संपर्क साधू शकता. तुमची समस्या तुम्ही चोला एमएस ला customercare@cholams.murugappa.com या आयडी वर ईमेल द्वारे पाठवू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
-
उत्तर:
तुम्ही तुमचा विमा हप्ता तीन प्रकारे भरू शकता
- डायरेक्ट बँक डेबिट (ऑटो डेबिट): तुम्ही ऑटो डेबिट सुविधेचा लाभ घेऊ शकता/ थेट चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स बँक खात्यात हस्तांतरित करू शकता. असे केल्यास तुम्हाला तुमच्या प्रीमियममध्येही सूट मिळेल.
- ऑनलाइन पेमेंट: विमा ई-पोर्टलवर तुमचे डेबिट/क्रेडिट कार्ड वापरून तुमचा प्रीमियम ऑनलाइन भरु शकता.
- मोबाईल पेमेंट: अलीकडेच विमा कंपनीने कार विमा प्रीमियम भरण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन लाँच केले आहे.
-
उत्तर: विद्यमान विमाधारक विम्याची स्थिती तपासण्यासाठी त्यांच्या वैध लॉगिन तपशीलांसह विमा कंपनीच्या संकेतस्थळावार लॉग इन करू शकतात. नवीन वापरकर्त्यांनी प्रथम त्यांचे खाते संकेतस्थळावार तयार केले पाहिजे आणि त्यानंतर ते त्यांची पॉलिसी स्थिती तपासू शकता. नोंदणी करण्यासाठी फक्त ५ मिनिटे लागतात.
-
उत्तर:
ऑनलाइन किंवा मोबाइल नोंदणीकृत वापरकर्ते, थेट त्यांच्या पॉलिसीचे नूतनीकरण करू शकतात. तथापि, इतरांसाठी, त्यांनी नूतनीकरण फॉर्म भरण्यासाठी आणि प्रीमियम रकमेचा धनादेश जोडण्यासाठी शहरातील कोणत्याही जवळच्या शाखेला भेट द्यावी.
ऑनलाइन वापरकर्त्यांसाठी प्रक्रिया पुढीलप्रमाणे:
- पायरी १ : कृपया ई-पोर्टलवर लॉगिन आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करा
- पायरी २ : पेमेंटची पद्धत निवडा- डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग
- पायरी ३ : पेमेंट पूर्ण करा आणि पावती प्रिंट करा
-
उत्तर: विमाधारकाद्वारे दाव्यांचा फॉर्म योग्यरित्या भरला गेला पाहिजे आणि आवश्यक कागदपत्रे (वैद्यकीय अहवाल आणि बिले) जोडाल्यानंतर अर्ज शहरातील कोणत्याही शाखेत जमा केले जऊ शकतो. चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स हे सुनिश्चित करते की दावे ३० दिवसांच्या विशिष्ट कालावधीत निकालात लावले जातील.
-
उत्तर: पॉलिसी रद्द करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पॉलिसीची कागदपत्रे आणि रीतसर भरलेला सरेंडर फॉर्म घेऊन तुमच्या शहरातील जवळच्या शाखा कार्यालयात जावे लागेल. लागू शुल्क वजा केल्यावर प्रीमियम विमाधारकला परत केला जाईल.